प्रत्येक आरोपित व्यक्तीला बचाव-संरक्षण देण्याचा अट्टाहास का? फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वनविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक तर एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण या प्रकरणी आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन काही सवाल उपस्थित केले आहे. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केलं आहे. यावेळी फडणवीसांनी RFO दीपाली चव्हाण प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वरील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

‘खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?’, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे. तसेच अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते, अशी खंतही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button