सरकार चालवत आहात की, WWF खेळतायत; मनसेकडून शिवसेना, राष्ट्रवादीला टोला

MSN & Shivsena & NCP

मुंबई :- राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणाव वाढल्याचं गेल्या दोन दिवसांपासून पुढे येत आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश देऊन राष्ट्रवादीने शिवसेनेवर कुरघोडी केली. त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने कल्याणमध्ये भाजपाची साथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर केलं. आता, या अंतर्गत सत्तासंघर्षावर मनसेनं टीका केलीय. मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार चालवत आहात की WWF सुरू आहे यांच्यात. इतरांना सांगायचे राजकारण नको आणि हे एकमेकांना पाण्यात बघायची एकही संधी सोडत नाही आहेत. बिनडोक सरकार…  असे म्हणत गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER