सरकारचा आदेश मराठीत का नाही? संजय राऊतांच्या ‘त्या’ Retweet ची चर्चा

Sanjay Raut-uddhav thackeray

मुंबई :- शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेलं एक रीट्वीट आज चर्चेत आहे. मूळ ट्वीटमध्ये राज्य सरकारने (State Govt) अनलॉकसंदर्भात काढलेली अधिसूचना मराठीत नसून इंग्रजीत का आहे? असा आक्षेप घेण्यात आला आहे. राज्य सरकाच्या काराभारात सुटसुटीत मराठी असण्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हेच ट्वीट संजय राऊत यांनी रीट्वीट केले, त्यांनी आपल्याच सरकारला या रीट्वीटमधून कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे.

राज्यात नुकतंच ‘ब्रेक द चेन’ मोहिमेत राज्यातले लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्या संदर्भात नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. ही नियमावली इंग्रजीत आहे. यावरुन सरकारवर टीका करत एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने ट्विट केले – सामान्य दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर त्यांना बडवणार, मराठी – मराठी करत मतही मागणार. पण, महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची सरकारी नियमावली दरवेळी इंग्रजीमध्येच! …..संपूर्ण कोरोना काळात हे सतत घडत आले ….सरकारच्या कामात सुटसुटीत मराठीला प्राधान्य का नाही?”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button