भारतात नाही तर पाकिस्तानात तिरंगा फडकवायचा का?; केजरीवालांचा सवाल

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टी सरकारने तिरंगा फडकावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याला भाजप आणि काँग्रेसकडून विरोध होत आहे. आता भारतात नाही, तर पाकिस्तानात तिरंगा फडकवायचा का? असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला.

दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी विविध मुद्‌द्‌यांवरून भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला. देश सर्वांचाच आहे. देशभक्तीवरून राजकारण करू नये. राष्ट्रध्वजाचे दर्शन सीमांवर सज्ज राहून लढणाऱ्या जवानांची जाणीव करून देते. त्यामुळे आप सरकारने अर्थसंकल्प मांडताना ५०० ठिकाणी तिरंगा फडकावण्याची घोषणा केली. या निर्णयाला भाजप आणि काँग्रेसने पाठिंबा द्यायला हवा, असे ते म्हणाले.

२०४८ या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवून देण्याचा मानस आप सरकारने व्यक्त केला. मात्र, आपण ते एकत्रितपणे साध्य करू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी केंद्राने आणि बहुतांश राज्यांनी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, कठीण काळातही शिल्लक बजेट सादर करणारे दिल्ली हे एकमेव राज्य होते, अशी टिप्पणी केजरीवाल यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER