
नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स अकॅडमीत महिलांच्या प्रवेशासाठी याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defense Academy) आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये (Indian Novel Academy) महिलांच्या प्रवेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सुनावणी करत होते.
सरन्यायाधीशांसमोर सुनावणी
महिलांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अॅड. कुश कार्ला यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेचसमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीला नोटिसा बजावल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी २०२० मध्ये इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशनमध्ये महिलांना सेवा जॉईन करण्यास मंजुरी दिली होती. या निर्णयाच्या आधारे याचिका दाखल केल्याचे अॅड. कार्ला यांनी म्हटले आहे. या दोन अकॅडमीत महिलांचे प्रवेश नाकारणे, हे मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे. नागरिक म्हणून महिलांना समान संधी देणे गरजेचे आहे, असे कार्ला यांनी याचिकेत म्हटले.
Supreme Court issues notice to Central govt on a plea seeking directions to allow eligible female candidates to join National Defence Academy & Indian Naval Academy at par with men
— ANI (@ANI) March 10, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला