पवार किंवा प्रमुख नेते का बोलत नाहीत? फक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न – फडणवीस

Devendra Fadnavis - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- सचिन वाझे प्रकरण अद्याप संपलेलं नाही, जोपर्यंत मनसुख हिरेण यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा खून कुणी केला याबाबत खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण लाऊनधरणार आहोत. कुस्तीत एखादा पहिलवान चित होतो, पण चित झाल्यानंतरही पहिलवान माझं बोट तर वर होतं पण मी चित झालो नाही, असं तो पहिलवान सांगत असतो. निव्वळ मुजोरी चाललेली आहे. जनतेला सगळं समजतं. जनता हे सगळं बघत आहे. हा मुंबई पोलिसांना विरोध नाही. पण मुंबई पोलिसात काही लोकं अशा प्रकारे वागत असतील तर त्यांचा फुले देऊन सत्कार करायचा का? त्यांची पाठराखण करत असतील तर तेच खऱ्या अर्थाने मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधारी नेत्यांवर लगावला.

यावेळी ते म्हणाले की, मला समजतच नाही, अशा काही घटना घडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) किंवा प्रमुख नेते काहीच बोलत नाहीत. केवळ माध्यमचं बातम्या देत असतात. हे बातम्या सोडण्याचं काम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) फक्त बातम्या सोडण्याचं काम करतात. त्यातून ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत डॅमज कंट्रोल होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या भाकिताची फडणवीसांनी केली सप्रमाण टिंगल, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER