कंगना हाथरसबाबत का बोलत नाही?- प्रियंका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi & Kangana Ranaut

मुंबई : सुशांत सिंह मृत्युप्रकरणात महाराष्ट्र सरकारवर टीका करणारी अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut) हाथरसच्या प्रकरणावर का बोलत नाही, असा प्रश्न शिवसेनेच्या (Shivsena) खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी कंगनाचे नाव न घेता विचारला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या – “दिवसरात्र मुंबई पोलिसांवर टीका करण्यासाठी जेव्हा वाय सुरक्षा देऊन जिला गौरवण्यात आले, जी महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्री आणि राज्याच्या बाबतीत आक्षेपार्ह टीका करत होती, माध्यमांची लाडकी होती ती आता गप्प का आहे? हाथरस प्रकरणी तिचे कोणतेही ट्विट  का दिसत नाही? हाथरस प्रकरणावरून कंगनाने आधी एक ट्विट केले होते. ३० सप्टेंबरला केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले होते, योगी सरकारवर माझा भरोस आहे. पीडितेला न्याय मिळेल. या प्रकरणावरून शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती.

उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे; पण उत्तरप्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे, असं म्हणत शिवसेनेने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER