प्रत्येक गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर का बोलत नाही, फडणवीस भडकले

Devendra Fadnavis-Anil Deshmukh

मुंबई :- लहान सहान विषयांवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी उपस्थित केला. पोलिसांचा तपास नेमक्या कुठल्या दिशेने सुरु आहे हे गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लिप बाहेर येत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प बसले आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे हे राज्याच्या जनतेला माहिती झालं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर निशाणा साधला. लहान सहान विषयांवर भाष्य करणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का स्पष्टीकरण देत नाहीत. तपास नेमक्या दिशेने सुरु आहे, हे राज्यातील जनतेला गृहमंत्री नेमकं का सांगत नाहीत?, त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत किंवा तपासून का पाहत नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर केली.

ही बातमी पण वाचा : मंत्री १० हजार लोक जमवतो, अधिवेशनाला मात्र कोरोना! फडणवीसांची ठाकरे यांच्यावर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER