मुंबई मनपा स्वबळावर लढणार, असे काँग्रेसने का म्हणायचे नाही? भाई जगतापांचा सवाल

Bhai Jagtap

मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक-२०२२ मध्ये होणार आहे. सर्व पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत; पण काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे म्हटले की महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेसला आघाडीची आठवण करून देते. यावर मुंबई (MUMBAI) काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी प्रश्न केला की, ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ ही काँग्रेसची घोषणा आहे; त्यामुळे मनपा निवडणूक स्वबळावर लढणार असे काँग्रेसने का म्हणायचे नाही? असे जगताप म्हणालेत.

आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाराष्ट्रात सत्तेत आहोत. मात्र मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात आहोत. महाविकास आघाडी ‘कॉमन मिनिमम प्रोगाम’वर चालते आहे. महापालिकेचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही. आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे २२७ जागांवर लढण्याचा मनसुबा मी जाहीर केला होता. पदभार स्वीकारला तेव्हा त्याचा पुन्हा उल्लेख केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात आहे. भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. सध्या शिवसेनेकडून अनेक नेते पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचे म्हणत आहेत. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी  शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER