आरेतील मेट्रो कारशेड आणि कोस्टल रोडबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका का?

image

मुंबई :- मुंबईतील मेट्रोकारशेडसाठी आरेचं जंगल वाचवण्यासाठी शिवसेना धडपडत आहे मग शिवसेनेचाच महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडसाठी असंख्य सागरी जीव आणि कांदळवनांच्या जीवांचा विचार शिवसेना का करत नाही असा प्रश्न कोळी बांधवांनी उपस्थित केला आहे. मेट्रो आणि कोस्टल रोड दोन्ही प्रकल्प मुंबईला वेगवान करणारे आहेत. मात्र, एकीकडे मेट्रो कारशेडला विरोध करुन ‘आरे वाचवा’ म्हणणारी शिवसेना आणि इतर स्वयंसेवी संस्था या दोन्ही प्रकल्पांमध्ये होणाऱ्या पर्यावरणाबाबत दुटप्पी भूमिका का घेत आहेत? हा प्रश्न कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांनी विचारला आहे.

ज्याप्रमाणे शिवसेना आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध करत आहे, त्याचप्रमाणे सागरी जीव आणि कांदळवन वाचवण्यासाठीही शिवसेनेनं कोळी बांधवांसोबत उभं राहवं, असं आवाहन कोळी बांधवांनी केलं आहे.