काँग्रेस वारंवार चीनसमोर लोटांगण का घालते ? नड्डा यांचा सवाल

Rahul Gandhi - JP Nadda

नवी दिल्ली :- अरुणाचलप्रदेशच्या (Arunachal Pradesh) सीमा भागात चीनने (China) गाव वसवल्यावरून काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली. यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी काँग्रेस (Congress) खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे.

नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करत, काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधी महिनाभराच्या सुटीवरून परत आले आहेत. त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार? तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी अरुणाचलप्रदेशसह हजारो किलोमीटर जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का? असे नड्डा यांनी विचारले.

काँग्रेस वारंवार चीनसमोर लोटांगण का घालते, असा सवाल करत राहुल गांधींचा चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी केलेले करार रद्द करण्याचा काय विचार आहे का, चीनकडून ट्रस्टसाठी मिळालेल्या देणग्या परत करणार का, असे बोचरे प्रश्न नड्डा यांनी विचारले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER