मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? संजय राऊतांना कंगनाचा टोमणा

Sanjay Raut - Kangana Ranaut

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मला धमकी दिली; पुन्हा मुंबईत परत येऊ नको, असे म्हणाले. यापूर्वी मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटते, असा टोमणा अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) संजय राऊत यांना मारला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणावर सतत बोलणाऱ्या कंगना रणौतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता.

मला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे कंगना म्हणाली होती. यावरून कंगनाने महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला म्हटले होते की, तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने तिच्या राज्यात जावे, परत येऊ नये. कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. म्हणाली – “शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नको, असे म्हणाले. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत.

ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” सुशांतच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी ड्रग माफियांबद्दल माहिती देण्यास तयार असलेल्या कंगनाला पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली होती. यावर, “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते.” असे उत्तर कंगनाने दिले होते. “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज. ” असे ती म्हणाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER