मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे का वागतात, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Maharashtra Today

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी काल गुजरातचा दौरा करून तौक्ते चक्रीवादळाने(tauktae cyclone ) झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावर महाराष्ट्राची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांची टीका केली – या वादळाचा फटका ५ राज्यांना बसला आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातचाच दौरा केला, मदतही केवळ गुजरातसाठीच जाहीर केली. ते केवळ गुजरातचेच मुख्यमंत्री असल्यासारखे का वागतात, इतर राज्यांची अवहेलना का करतात?

या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा करुन राज्याला १ हजार कोटींची मदत जाहीर केली.

देशभरात तौत्के चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागालाही मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, गुजरात १ हजार कोटींची मदत जाहीर केल्याने इतर राज्यांना मोदींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतो आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button