जगभराला अत्तराचं वेड लावणाऱ्या बदरुद्दीनला भाजप का म्हणतीये आसामचा शत्रु?

आसामच्या २०२१ विधानसभा निवडणूकांची (Assam’s 2021 Assembly elections) घोषणा झाली आणि एक नाव माध्यमांसमोर झळकायला लागलं. ‘मौलाना अजमल बदरुद्दीन.’ आसामच्या बंगाली मुस्लीमांचा चेहरा. आसामचं राजकारण देशाच्या राजकारणापेक्षा वेगळ आहे. आसामी संस्कृती टिकावी म्हणून तिथले स्थानिक आसामी लोक आणि बंगाली मुस्लीम यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. म्हणून आसाममध्ये सीएएला मोठ्याप्रमाणात समर्थन मिळालं होतं.

आसामच्या राजकारणात मुस्लीमांची हिस्सेदारी मोठी आहे. आसामात एकूण लोकसंख्येच्या ३४ टक्के लोकसंख्या मुस्लीमांची आहे. त्यामुळं तेथील मुस्लीमांचं मत निर्णायक असून या भल्यामोठ्या वोट बँकेवर अजमल बदरुद्दीन आपला हक्क सांगतायेत.

भाजपानं पश्चिम बंगाल प्रमाण इथंही मोठा जोर लावालला सुरुवात केलीये. आसाम जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या भाजपनं बदरुद्दीन यांच्यावर टीका करताना ‘आसामाचा शत्रु’ असा त्यांचा उल्लेख केलाय. जगभरात अत्तराची विक्री करणारा उद्योजक, इस्मामधर्मीयांचा मौलाना आणि आसामच्या बंगाली मुस्लीमांचा मसिहा म्हणून ओळख मिळवणारे बदरुद्दीन यांच्याकडं आसामच्या सत्तेच्या चाव्या असल्याचं बोललं जातंय. यंदाच्या आसाम विधानसभा निडवणूकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मौलाना बदरुद्दीन यांना घेरण्याचे प्रयत्न करताना भाजप दिसतंय.

इतिहास

तारिख ३ एप्रिल २००५ ठिकाण गुवाहटी. एका विशाल सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत जमीयत उलेमा ए हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना असद मदनी जेव्हा मुस्लीम मागण्या मांडताना आसाम सरकार पाडण्यीची धमकी देत होते, तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई त्याच व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंतसहीत अनेक दिग्गज नेते मदनी यांच भाषण ऐकून चकीत झाले होते. याच उलेमा ए हिंदच्या ताकद आणि प्रभावाचा वापर करुन मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी आसामच्या राजकारणात पाऊल ठेवलं होतं. आसाममधल्या मुस्लीमांच्या ताकदीच्या बळावरच मुख्यमंत्र्यांच तत्कालीन सरकार पाडण्याच विधान मदनी करत होते.

मदनी यांच भाषण आसामाच्या राजकारणात नव्या पक्ष्याच्या जम्नाचे संकेत देत होतं आसाममध्ये स्थायिक झालेल्या बंगाली मुसलमानांच्या राजकीय भूमिका ठरवण्याच काम मदनींनी केलं. एआयडीयूएफ अखिल भारतीय लोकशाही संयुक्त मोर्चा या पक्षाची त्यांनी २३ ऑक्टोबर २००५ ला स्थापना केलीये. आज हेच बद्रुउद्दीन आसामात काँग्रेस आघाडीचं नेतृत्व करतायेत.

बदरूद्दीन फक्त राजकारणी नाहीत ते एक व्यावसायिक ही आहेत. जगभरात त्यांचा कंपनीची कोरोडो रुपये किंमतीची अत्तर विकली जातात. त्यांच्या मुळ जिल्ह्यात त्यांनी ५०० बेड्सच हॉस्पीटलही उभारलंय. यासोबतच आसामच्या अनेक महाविद्यालय, मदरसे, अनाथाश्रमांमध्ये मोफत विद्यादानाचं काम त्यांच्यामार्फत होतंय.

बदरुद्दीन आज ७१ वर्षाचे आहेत. त्यांचा जन्म आसामच्या होजाई जिल्ह्यातल्या गोपाल नगर नावाच्या छोट्या खेड्यात झाला. तिसऱ्या इयत्तेपर्यंतच त्यांना शिक्षण घेता आलं. यानंतर वडीलांसोबत ते मुंबईला निघून गेले. नंतरच्या काळात बदरुद्दीन यांनी दारुल उलुम देवबंद इथून इस्लामचं आणि अरबीमध्ये फाजील ए देवबंद येथून पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केलं.

बदरुद्दीन यांचे वडील सुरुवातीच्या काळात गावी शेती करायचे. नंतरच्या काळात त्यांनी अत्तर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या व्यापारात ते उतरले. इथल्या व्यवसायातील यश त्यांना मुबंईकडे घेऊन गेलं.

वडीलांच्या व्यवसायाला बदरुद्दीन भारताबाहेर घेऊन गेले. दुबईसहीत अनेक बाहेरील देशांमध्ये त्यांचे अत्तराचे शोरूम आहेत. लंडन आणि अमेरिकेत त्यांनी अत्तरं बनवणारे कारखाने सुरु केलेत. मुंबईत रिअल इस्टेटपासून चमड्याच्या व्यवसायात उतरले. आरोग्य सेवा, कापड उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलं.

आसामातील मुस्लीम मतदान

२०११च्या जनगणनेनूसार आसामात मुस्लीम समाजाची लोकसंख्या ३४ टक्के आहे. आसामात बंगाली मुस्लीमांच्या राजकिय आणि आर्थिक हितासाठी वेगळी पार्टी बनवण्याचा इतिहास मोठा आहे.

१९७७ला आसामात इस्ट इंडीया मुस्लीम पार्टी बनवण्यात आली. १९७९ला आसाममध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि ही पार्टी फार काळ टिकू शकली नाही. यानंतर १९८५ला आसामात युनायटेड मायनॉरिटी फ्रंट (युएमएफ) नावानं मुस्लीम मतांच्या एकत्रीकरणासाठी राजकीय व्यासपीठ निर्माण करण्यात आलं. यात जमीयतची सक्रीय भूमिका होती. नंतर यात सर्व काँग्रेसनेते सामील झाले होते.

बदरुद्दीन यांनी राजकारणात पाऊल ठेवून आतापर्यंत १५ वर्ष झालीत पण त्यांच राजकारण हे बंगाली मुस्लीमांच्या अवती-भवती फिरताना दिसतंय. येत्या आसाम विधानसभेच्या निवडणूकीचा निकालांवर बद्रुद्दीन काय कितपत प्रभाव पाडू शकतात याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER