राहुल गांधीना रोज मुजरा करण्याचे दिवस का आलेत तुमच्यावर?

- भातखळकरांचा शिवसेनेला टोमणा

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावरून शिवसेनेने सामनाच्या संपादकीयातून भाजपावर टीका केली. याला उत्तर देतांना भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला, … राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस तुमच्यावर का आलेत, याचा विचार करा!

सामानाने लिहिले, बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेतेमंडळींना फोडून भाजपा निवडणूक लढताना दिसत आहे. मोदींचा टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदी (PM Modi) असा उल्लेख केला. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला आणि ‘सामना’ला टोमणा मारला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची दोन दिवसांपूर्वीच जयंती साजरी करण्यात आली. मुंबईत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले नाही. याची आठवण देत अतुल भातखळकरांनी काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला ट्विट करून सुनावले – “सामना’ने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे, त्याचा विचार करावा. शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…”?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER