‘या’ मुघल बादशहाला का मिळालं नाही हिंदुस्थानात दफन होण्याचं भाग्य ?

Mughal emperor

“ग़ज़ियोंमें बू रहेगी जब तलक ईमान की.. तख़्त ऐ लंदन तकचलेगी तेग हिंदुस्तान की.” ही शायरी लिहिली आहे शेवटचा मुघल बादशहा बाहदुर शाह जफरनं…

भारतावर अनेक आक्रमणं करून मुघल भारतात आले. पण सगळेच मुघल बादशहा क्रूर होते असं कोणताही इतिहासकार ठणकावून सांगत नाही. माणसातल्या चांगुलपणाचं कौतुक करावं अन वाईटाला शिव्या घालाव्या. मोकळं व्हावं. काही मुघल बादशहांनी भारतावर प्रेम केलं. त्याबद्दल भारतीयांनाही त्यांचा गौरव केल्याचा इतिहास आहे.

बादशहा अकबराच्या इतिहासाकडे यावेळी नजर टाकता येऊ शकते. जनतेला अकबराची राज्यकारभार करण्याची पद्धत आवडल्यामुळे ‘अकबर’ ही पदवी जनतेने अकबराला दिली होती.  अशाच एका विषयाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. शेवटच्या मुघल बादशहाचा शेवट कसा झाला तुम्हाला माहित आहे का ? शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफरला मरताना वितभर जमीनही मिळाली नाही, असं तुम्हाला सांगितलं तर ? हो विषय तसाच आहे.  या बादशहाला इंग्रजांनी प्रचंड त्रास दिला. जिथे त्याने राज्य केलं त्या जागेपासून त्याला दूर ठेवलं.

1857 ला झालेल्या इंग्रजांविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व मुघल बादशहा बहादुर शाह जफरने केलं. तेव्हा त्याचं वय होतं 82 वर्ष. सुरुवातीचा काही काळ युद्धाचे परिणाम त्याच्या बाजूने दिसत होते, पण नंतर हवाबदलली. इंग्रजांचं पारडं जड होत गेलं आणि इंग्रजांपासून वाचण्यासाठी अहमद शाहला हुमायूँच्या मकबर्‍यात सहारा घ्यावा लागला.

मकबर्‍यात अहमद शाह फार काळ टिकू शकला नाही. इंग्रज अधिकारी विल्यम स्टीफन हडसनने मकबर्‍याला वेढा दिला आणि अहमद शाह जफरला अटक करण्यात आली.  त्यानंतर काही दिवस जेल मध्ये राहिल्यानंतर अहमद शाह जफरवर खटला चालवण्यात आला.

हिंदुस्थानाचा मुसलमान बादशहा हिंदुस्तानाबाहेरच्या अन्य मुसलमान बादशहांसोबत मिळून इंग्रज सत्ता संपवण्याचा कट करतोय असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला, आणि लवकरात लवकर त्याला हिंदुस्तानाच्या बाहेर घेऊन जाण्याचं निर्णय देण्यात आला.

एका सकाळी 4 वाजताअहमद शाह जफरला उठवून या देशाच्या बाहेर नेतोय, असं सांगितलं गेलं पण कुठे ते त्याला कुणीही सांगितलं नाही. त्याला रंगूनला नेण्यात आलं. आणि तिथल्या एका कोठडीत ठेवण्यात आलं. काही दिवसांनी तिथेच अहमद शाहने आणि 350 वर्षाच्या मुघल सत्तेने अखेरचा श्वास घेतला.

बाहदुर शाहच्या मृत्यूनंतर तो राहत असलेल्या कोठडीच्या मागे त्याला दफन करण्यात आलं. अखेरच्या मुघल बादशहाला कुठे दफन करण्यात आलं, याची खबरबात कुणालाच लागू नये, अशी इंग्रजांची इच्छा होती परंतु एखाद्या सत्तेचं संपणं इतकं सोप्पं नसतं.

शाहचं हिंदुस्थानावर प्रचंड प्रेम होतं. मेल्यानंतर हिंदुस्थानात दफन करण्यात यावं अशी त्याची इच्छा होती. त्यासाठीची जागाही त्याने तयार ठेवली होती, पण त्याचा अंत त्याच्या इच्छेप्रमाणे होऊ शकला नाही. ज्या देशावर प्रेम केलं, जिथं सत्ता गाजवली, तिथं अखेरचा श्वास घेण्याचं भाग्य त्याला लाभू शकलं नाही, याला इतिहासाने त्याच्यावर केलेला अन्यायच म्हणता येईल.

बहादुर शाह जफरने लिहिलेल्या अनेक शायऱ्याही प्रसिद्ध आहेत. त्याने तुरुंगात असतानाही अनेक शायऱ्या लिहिल्या. तुरुंगात असताना त्याने लिहीलेल्या शायर्‍यांपैकी एका शायरीत तो स्वतःच्या भूमीपासून दूर असल्याचं आणि शेवटच्या घटका तिथे मोजता येत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त करतो. तो म्हणतो, कितना है बदनसीब ज़फ़र दफ़्न के लिए, दो गज ज़मीन भी नमिली कू-ए-यार में

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER