वयाच्या २५ व्या मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या सुषमा स्वराज यांना का मिळाली नव्हती पंतप्रधानपदाची उमेदवारी?

Why didn't Sushma Swaraj, who was sworn in as a minister at the age of 25, get the PM's candidature

सुष्मा स्वराज (Sushma Swaraj)भाजपच्या (BJP) कणखर नेत्या होत्या. आक्रमक आणि व्यासंगी या दोन्ही गुणांचा अनोखा मेळ त्यांच्या व्यक्तीमत्वात होता. विदेशी मंत्री असताना त्यांनी मोठे काम करत त्यांनी स्वतःची प्रतिमा जपली. समाजवादी चळवळीतून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरूवात केली. पुढं जोमानं त्यांनी राजकीय कारकिर्द सुरु ठेवली. त्यांनी मुरब्बी राजकारणी असल्याचं सिद्ध करत सुष्मांनी वयाच्या २५ व्या वर्षी आमदारकी जिंकून मंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं.

जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. त्यांच्या शेजारी होते समाजवादी नेते मधु लिमये आणि पुढं होती २५ वर्षाची पंजाब विद्यापीठातली विद्यार्थीनी जिचं वाद विवाद स्पर्धेत मोठं नाव होतं, सुष्मा शर्मा. आता ती विद्यार्थीनी नव्हती, आंदोलक होती, वकील होती, आमदार होती आणि मंत्रीसुद्धा. हरियाणाच्या चौधरी देवीलाल सरकारमध्ये. स्वराज कौशल यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांच नावंही बदललं. सुष्मा स्वराज.

१४ फेब्रुवारी १९५२ ला जन्मलेल्या सुष्मा इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर मोराराजी देसाई पंतप्रधान होईपर्यंत २५ वर्षांच्या झाल्या होत्या. आमदारीकीची निवडणूक लढण्यासाठी लागणाऱ्या वयाची अट त्यांनी पूर्ण केली होती. त्यांना अंबालातून तिकीट मिळालं. निवडूण आल्या. मुख्यमंत्री देवीलाल यांच्यासमोर मंत्रीपदासाठी जेव्हा त्यांच नाव आलं तेव्हा देवीलाल यांनी नकार दिला पण जे.पी नारायण आणि चंद्रशेखर यांच्या दाबावामुळं सुष्मांना मंत्रीपद मिळालं. वयाच्या २५व्या वर्षी सुष्मा स्वराज रोजगार मंत्री होत्या.

पण ३ महिने होतात न होतात देवीलाल यांनी सुष्माला पदउतार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ही गोष्ट कानावर पडताच सुष्मा जनता दलांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या केबिनमध्ये पोहचल्या. सुष्मांच मंत्रीपद चंद्रशेखर यांनी स्वतः हस्तक्षेप करत वाचवलं.

तीन वेळा लोकसभा निवडणूकीत पराभव

आणीबाणीचा फटका इंदिरा गांधीना हसला. सत्तेवरुन पाय उतार झाल्या. बिगरकाँग्रेसी सरकार बनलं. पण हे सरकार जास्त काळ टिकलं नाही. इंदिरा परत निवडूण आल्या. मोरारजीसह जनता दलाला सत्ता गमावावी लागली. १९७९ ला सुष्मा जनता दलाच्या हरियाणाच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या. १९८० करनाला लोकसभा मतदार संघातून त्या मैदानात उतरल्या. सुषमा यांचा पराभव झाला तब्बल १ लाख १७ हजार मतांनी. पण त्या खचल्या नाहीत. सुषमा यांना चिरंजीलाल यांनी सलग तीन वेळा लोकसभेच्या निवडणूकीत पराभूत केलं. १९८९ ला तर फक्त सहा हजार मतात सुष्मांचा पराभव झाला. पण पुढच्याच वर्षी १९९० ला त्या संसदेत पोहचल्या. राज्यसभेची खासदारकी घेऊन.

अटल बिहारींचा प्रभाव

१९९९ला वाजपेयींचे सरकार एका मतात पडलं. नंतर कारगील युद्ध झालं आणि त्यानंतर निवडणूका होणार होत्या. सुष्मांनी दक्षिण दिल्लीत प्रस्थ मजबूत होतं. पण पक्षाच्या सांगण्यावरुन त्यांना कर्नाटकच्या बेल्लारीतून त्यांना सोनिया गांधींच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आलं. त्यांनी कडवी झूंज दिली. नंतर वाजपेयींच्या २००४ च्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या.

२०१३ ला मोदींऐवजी अडवाणी गटाला त्यांनी समर्थन केलं. पुढं मोदींच्या कॅबिनेटमध्ये विदेश मंत्री ही राहिल्या. संघाशी जुळवून घेण्यात आलेलं अपयश आणि आजारपणामुळं त्यांना भाजपच अध्यक्षपद सोडावं लागलं. आरोग्याच कारण देत २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याच त्यांनी जाहीर केलं.

पंतप्रधानपदाची हूलकावणी

२०१४ येऊपर्यंत कॉंग्रेसची सत्ता जाणार हे जवळपास निश्चित होतं. भाजप निवडणूकांच्या जोमानं तयारीत होती. भाजपनं २०१२ पासूनच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी योग्य नेत्याच्या नावाची शोधाशोध सुरु केली होती. लालकृष्ण अडवाणींचं नाव या शर्यतीत सर्वात पुढं होतं. ते भाजपाचे सर्वात जेष्ठ नेते होते आणि २००९च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार ही.

अडवाणींसोबत होता त्यांचा विश्वासपात्र गट. मुरली मनोहर जोशी आणि सुष्मा स्वराज. २००४ला अडवाणी विरोधीपक्ष नेते होते त्यामुळं २००९ला त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.

तर २००९च्या लोकसभेत विरोधीपक्ष नेते पदी सुष्मा स्वराज हो्त्या. त्यामुळं २०१४ ला पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी त्यांचं पुढं येत होतं. सुष्मा स्वराज यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता. परंपरेनूसार विरोधी पक्षनेताच पंतप्रधानाचा उमेदवार असतो, हे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्वतःची दावेदारी ठोकली होती. जर साऱ्या गोष्टी त्यांनी विचार केल्यासारख्या घडल्या असत्या तर पंतप्रधानपदी त्याच असत्या. पण राजकारणात गोष्टी ठरवल्याप्रमाणं घडत नसतात. नरेंद्र मोदींच नाव तोपर्यंत सगळ्यांच्या मनात आलं होतं. मोदींच्या नावाचा करिष्मा संपूर्ण देशावर निर्माण झाला होतो.

नंतर मोदींच्या कार्यकाळातही त्यांनी सरकारमध्ये उत्तम काम केलं. २०१९ला दिल्लीच्या एम्स रुग्णयलात ह्रदय विकारामुळं त्यांचं निधन झालं. भारतीय राजकारणातील एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER