कुणामुळे संसदेत पोहचलेल्या अमिताभचा निभाव का लागला नाही?

Amitabh Bacchan - Maharashtra Today

अमिताभ बच्चन, बॉलीवूडच्या शेहनशाहसाठी त्याचं नावंच त्याची ओळख बनली आहे. लाखोंच्या दिलावर आपल्या अभिनयाच्या जोरावर अमीट छाप उमटवणाऱ्या कलाकाराला भारतीयांनी कधीच डोक्यावरुन उतरवलं नाही. पण एक वेळी अशी होती जेव्हा संपूर्ण देश बच्चन यांची निंदा करत होता.

बच्चन यांच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. त्यातलाच एक किस्सा जेव्हा बच्चन स्वतःला राजकारणाशी जोडू पाहत होते तेव्हांचा. बॉलीवूडचा शेहनशाह पहिल्यांदा नवराजकारणी बनला आणि त्याच्यावर जनतेनं ‘बोफोर्सचा दलाल’ असा शिक्का मारला.

इतिहासाची पानं पलटून १९८७ मध्ये जाऊ. बोफोर्स घोटाळ्यामुळं देशात मोठा राजकीय भूकंप झाला. तेव्हा अमिताभ बच्चन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी जवळीक साधून होते आणि इल्हाबादहून खासदार. १९८४ ला कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून ते विजयी झाले होते. हेमवती नंदन बहूगुणा यांचा पराभव केला होता. हेमवती बहूगुणा हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिले होते. १९८४ ला इंदिरांची हत्या झाली. यानंतर देशभरातून कॉंग्रेस पार्टीबद्दल सहानभूतीची लाट निर्माण झाली. राजीव गांधी यांनी त्यांचे मित्र अमिताभ बच्चन यांचं राजकारणात येण्यासाठी मन वळवलं.

कॉंग्रेसच्या नजरेत इल्हाबादहून विजयी होण्याची पात्रता अमिताभ यांच्यात असल्याचं स्पष्ट होतं. हेमवती नंदन बहूगुणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिले असल्यामुळं त्यांचही राजकीय वजन मोठं होतं. इल्हाबाद हेमवती नंदन यांचा बालेकिल्ला होता. बहुगुणा १९८४ ला लोकदलच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. विरोधी पक्षांचा पाठिंबा त्यांच्या मागं होता. तर दुसऱ्या बाजूला ८४ पर्यंत अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडवर आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं होतं. लोकांमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. एकूणच ‘काटे की टक्कर’ असं वातावरण निर्माण झालं होतं. अमिताभ बच्चन यांची एक झलक बघण्यासाठी युवक अक्षरशः वेडे व्हायचे. युवतींनाही अमिताभ यांच आकर्षण होतं.

अनेक राजकीय विश्लेष्कांना अंदाज बांधणं कठिण होतं की निवडूण कोण येईल. कॉंग्रेसबद्दलची सहानभूतीची लाट आणि अमिताभ बच्चन यांच्या स्टारडममुळं कॉंग्रेसनं इल्हाबाद जिंकलं. १ लाख ७७ हजार मतांनी अमिताभ बच्चन निवडूण आले. यानंतर त्यांनी राजकीय वजन वापरायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि छोट्या मोठ्या कॉंट्रॅक्टसाठी बच्चन यांनी भरपूर डावपेच खेळले. राजीव गांधी यांच्याकडे बच्चन यांची तक्रार सुद्धा अनेक बड्या कॉंग्रेसी नेत्यांनी केली होती.

पुढं उजाडलं १९८७. बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचारानं वर्तमान पत्रांचे मथळे व्यापून टाकले होते. राजीव गांधींवर वारंवार घोटाळ्याबद्दल टीका होऊ लागली. आरोपांच्या वण्याव्यानं कॉंग्रेसला घेरलं आणि रजीव गांधींचे निकटवर्तीय अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका व्हायला सुरुवात झाली. लोक त्यांना ‘बोफोर्सचा दलाल’ म्हणून लागले. यामुळं अमिताभ बच्चन दुखावले त्यांनी एकाएकी खासदारकीचा राजीनामा दिला. राजकारणात जाणं सर्वात मोठी चुक असल्याचंही त्यांनी अनेक मुलाखतीत नंतरच्या काळात बोलून दाखवलं होतं.

काय होतं बोफोर्स प्रकरण

२४ मार्च १९८६ ला स्वीडनची युद्ध सामग्री उत्पादक कंपनी बोफोर्स आणि भारत सरकार यांच्यामध्ये १ हजार ४३७ कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. यात १५५ एमएमच्या ४०० ‘होवित्जर तोफा’ विकत घेण्यात आल्या. पुढं १६ एप्रिल १९८७ ला भारतात राजकीय भूकंप झाला. स्वीडीश अधिकाऱ्यांनी दावा केला की या व्यवहारासाठी भारताच्या वरिष्ठ राजकारण्यांनी आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० कोटी रुपयांची लाच खालली आहे. यानंतर ६ ऑगस्टला या लाचखोरीच्या तपासासाठी संसदेने संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली. याचं नेतृत्त्व बी. शंकरानंद यांनी केलं. फेब्रुवारी १९८८ मध्ये या प्रकरणाच्या तपासानं स्वीडन गाठलं. या प्रकरणाच्या आरोपाचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला. यामुळं कॉंग्रेसला सत्ता सोडावी लागली. या आधीच बच्चन यांनी १९८७ ला राजीनामा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button