पवित्र ‘रमझान’ महिन्याला ‘रमदान’ म्हणण्याचा ट्रेंड भारतात का सुरू झाला?

Maharashtra Today

दरवर्षी प्रमाणं या वर्षीसुद्धा मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान (Ramadan) महिना आलाय. सोबतच एका शब्दावरुन चर्चेला सुरुवात झालीये. या पवित्र महिन्याला रमजान म्हणावं की रमदान? ऐतहासिक दृष्टीकोनातून बघितलं तर शेकडो वर्षांपासून मुस्लीम धर्मीय भारतीय रमजान महिना अगदी आनंदात साजरा करतात. फारसी भाषेतून आलेला हा शब्द उर्दू, हिंदी, मराठी, बंगालीसह सर्व भारतीय भाषा बोलणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्या परिचयाचा हा शब्द आहे. गेल्या काही वर्षांपासून रमजान महिन्याला रमदान म्हण्याचं प्रचलन भारतात वाढतं आहे. या मागं काय कारणं आहेत याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

भारतीय इस्लामाच मुळं अरबी नाहीतर फारसी संस्कृतीत सापडतात

या महिन्याचं नाव अरबी भाषेतून रोमन भाषेत भाषांतरीत केलं तर आणि हिंदीत त्याचं उच्चारण केलं तर ‘रमदान’ असा उच्चार केला जातो. विशेष बाब ही आहे की. प्राचिन अरेबी भाषामध्ये ‘द’ अक्षराचं केलं जाणारं उच्चारण करण्यासाठी न हिंदीत तसा शब्द सापडतो न इंग्रजीमध्ये. भारतीय मुस्लीम याचा उल्लेख ‘द’ असं करतात तर पाश्चिमात्य देशातील मुस्लीम धर्मिय ‘ड’ असा उच्चार करतात.

भाषा ही एखाद्या समुदायाची ओळख असते. लोक नेहमी भाषेला आदर्शरुपात ठेवण्याचा प्रयत्न करतात. अरबीतल्या उच्चरांना येणाऱ्या अडचणींवरुन स्पष्ट होतं की असं करणं किती अवघड गोष्ट आहे. भारतीय मुस्लिम रमजान ऐवजी रमदान म्हणत असतील तर त्याचा होणारा उच्चार ही मुळ अरेबी शब्दासारखा नसून चुकिच्या पद्धतीने होतो. उच्चारण चुकिचं असेल तर या कवायतीचा अर्थ काय निघतो?

भारतीय मुस्लीम समाज रमजानऐवजी रमदान हा शब्द वापरत या शब्दाकडे फक्त धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता सांस्कृतीक दृष्टीकोनातून पाहत असल्याचं स्पष्ट दिसतं. उर्दू भाषिक मुस्लीम लोक हा उच्चार जास्ती प्रमाणात करत असल्याचं स्पष्ट दिसून येतं.

केरळचा अपवाद सोडला तर भारतात रुजलेला इस्लाम धर्माचं मुळ अरबातलं नसून ते मध्य आशिया आणि इराणमधलं आहे. भारतीय इस्लामाची मुळं ही अरब संस्कृतीत नाही तर फारसी संस्कृीत सापडतात. इतकंच नाहीतर फारसी ही मोठ्या कालावधीसाठी भारताची राजभाषा होती. मराठी आणि बंगाली भाषेत फारसी शब्द विपुल प्रमाणात आढळतात. हिंदी भाषेला हिंदी हे नाव सुद्धा फारसी भाषेनं दिलंय. इराणमध्ये भारतीयांना ‘हिंदी’ असं संबोधलं जातं. त्यावरुनच भाषेचं नाव सुद्धा हिंदी म्हणून रुढ झालं.

अरबांचा प्रभाव भारतात कसा वाढला

अरबमधल्या इस्लामात सुरु असलेल्या धार्मिक बदलांचा थेट प्रभाव भारतीय इस्लामावर पडत असल्याचं स्पष्ट दिसतं. पहिल्या महायुद्धानंतर ‘सउद’ परिवारानं अखाती देशातील मोठ्या हिस्स्यांवर कब्जा मिळवला. मक्का आणि मदिना ही पवित्र स्थळंसुद्धा याच परिवाराच्या राज्यात सामील होती. सउद परिवारा ‘वहाबी’ या कट्टर मुस्लिम विचारधारेला मानत होती.

सउद परिवाराचा इराणवरही कब्जा होता. इतका महाकाय प्रदेश ताब्यात असूनही त्यांचा प्रभाव म्हणावा असा नव्हता. त्यांचं नशिब तेलाचा शोध लागल्यानंतर बदललं. उद्योग व्यवसाय वाढीला लागून तिथं भरभराट सुरु झाली. अरब श्रीमंत झाले. दुसऱ्या बाजूला फारसी साम्राज्य लयास गेलं. अरबांच्या समृद्धीनं अनेकांना प्रभावित केलं भारतीय मुस्लीमसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. त्यामुळं मुळ फारसी संस्कृतीतून पुढं आलेला भारतीय इस्लाम संस्कृती अरबीनं प्रभावीत झाली. त्यामुळंच अरेबीचा आग्रह धरत रमदान म्हण्याचा प्रघात पडतोय.

पाकिस्तानाचं उदाहरण इथं देता येईल. पाकिस्तानातील विद्वान आणि लोकप्रिय इस्लाम विचारक आणि प्रचारक व्यक्ती इस्लाममधल्या अरबी प्रतिकांना गर्वाने स्वीकारत आहेत. भारतातले काही मुस्लीम धर्मअभ्यासक, खेळाडू, टीव्हीवरील ओळखीचे चेहरे, रमजानचा उल्लेख रमदान असा करतात.

फक्त रमजान नाहीतर खुदा हाफिज हा शब्दही बदललाय

मुस्लिम धर्मियांमध्ये एकमेकांना अभिवादन करताना ‘खुदा हाफिज’ असं बोललं जात होतं. याला बदलून सर्सासपणे ‘अल्लाह हाफिज’ बोललं जात असल्याचं तुम्हाला दिसून येईल. मुस्लीमांच्या सांस्कृतीक अभिव्यक्तीमधला सर्वाधिक वापरला गेलेला हा ‘खुदा’ हा शब्द अरेबिच्या प्रभावामुळं बदलला गेलाय. धार्मिक बाबतीत शब्दांना बदलून वापरणं ही मोठी गोष्ट नाही. यामुळं विशेष फरक ही पडत नाही; पण स्थानिकता, अभिव्यक्तीशी जोडले गेलेले महत्त्वाचे शब्द जर बदलले जात असतील तर संस्कृतीतही बदल होतात. असं म्हणलं वावग ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button