नक्षलवादाची दिशाहीनता पाहून नक्षलवाद सुरु करणाऱ्या नेत्यानं का केली होती ?

Maharashtra Today

छत्तीसगडच्या विजापूर भागात नक्षलवाद्यांनी(Naxalism) केलेल्या भ्याड हल्लयात २३ जवान शहिद झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जातोय. विरोधक असोत की सत्ताधारी, नक्षलवाद्यांवर तीव्र कारवाई करण्याची मागणी होते आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) यावर प्रतिक्रिया देत नक्षलवाद्यांना त्यांच्यात भाषेत उत्तर देऊ असं ठणकाहून सांगितलंय. भारताला नक्षलवादाची ही किड लागली कशी, कोणत्या कारवायांमुळं भारत हदरला आणि सैन्यानं नक्षलवाद्यांच्या खात्म्यासाठी कोणत्या कारवाया केल्या यावर टाकलेली एक नजर.

नक्षलवाद – कम्यूनिस्ट क्रांतीकाऱ्यांच्या भारतीय कम्युनिस्ट आंदोलनातून (Indian Communist Movement) सुरु झालेल्या क्रांती प्रक्रियेनं नक्षलवादाचं रुप घेतलं. बंगालच्या ‘नक्षलबाडी’ गावापासून सशस्त्र आंदोलनाची सुरुवात झाल्यानं ‘नक्षलवाद’ हे नाव रुढ झालं. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते ‘चारु मुजुमदार’ आणि ‘कानू सन्याल’ यांनी १९६७ मध्ये या आंदोलनाची सुरुवात केली. मुजुमदारांवर चीनचा कमुनिस्ट नेता माओ याचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळंच नक्षलवाद्यांना ‘माओवादी’ म्हणून देखील ओळखलं जातं. १९६८ साली कम्यूनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिज्म अँड लिनिझन (सी.पी.एम.एल.) ची स्थापना दिपेन्द्र भट्टाचार्या(Dipendra Bhattacharya) यांनी केली. मार्क्स आणि लेनिनच्या सिद्धांतावर हे लोक काम करु लागले.

१९६९ साली चारु मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी सरकारच्या भुमि अधिग्रहणाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन उभारलं. सर्वात आधी या कायद्याला नक्षलबाडीमधून विरोध झाला. नक्षलवादाला इथून सुरुवात झाली. पहिल्यांदा कॉंग्रेस बंगालमधून सत्तेतून बाहेर फेकली गेली. नक्षलवादाच्या वाढत्या प्रभवाचं हे पहिलं लक्षण होतं. या आंदोलनामुळं डाव्यांनी पश्चिम बंगाल जिंकलं १९७७ला पहिल्यांदा कम्युनिस्ट पार्टीचं सरकार बनलं. ज्योती बसू मुख्यमंत्री झाले.

सामाजिक जागृतीसाठी सुरु झालेल्या या आंदोलनातनंतरच्या काळात राजकीय वर्चस्व वाढायला सुरुवात झाली. आंदोलन मुद्द्यांवरुन भरकटलं. आंदोलनाची व्याप्ती जेव्हा बिहारपर्यंत पोहचली तेव्हा आंदोलन पुर्णपणे दिशाहीन झालं होतं. ‘जमीनीच्या’ लढाईसाठी सुरु झालेलं आंदोलननंतरच्या काळात ‘जातीय’ लढाईत बदललं. इथून उच्च वर्ग आणि मध्यम वर्गाच्या संघर्षाला सुरुवात झाली. या संघर्षानं आत्ताच्या उग्र नक्षलवादी आंदोलनाचं रुप घेतलं. १९७२ साली हिंसक आंदोलनामुळं चारू मुजुमदारांना अटक झाली. त्यांना दहा दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नक्षलसवादी आंदोलनाचे प्रणेते कानू सन्याल यांनी नक्षलवादी आंदोलन राजकारणाचं शिकार झाल्याचं पाहून संतापात २३ मार्च २०१० ला त्यांनी आत्महत्या केली.

नक्षलवादी कारवायांमुळं देश हादरून गेला होता

* २००७ ला छत्तीगडच्या बत्सरमध्ये ३०० विद्रोह्यांनी ५५ पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली
*२००८ला ओडीसामध्ये नक्षलवाद्यांनी १४ पोलिस आणि नागरिकांना जीवे मारलं
*२००९मध्ये गडचिरोली नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ सी.आर.पी.एच. जवान मरण पावले
*२०१०ला नक्षलवाद्यांनी मुंबई कलकत्ता ट्रेनमधल्या १५० नागरिकांना जीवे मारलं
*२०१०मध्ये बंगालच्या सिल्दा कॅम्पमध्ये घूसून २४ अर्धसैनिक बलाच्या जवानांची हत्या नक्षलवाद्यांनी केली.
*२०११ला छत्तीगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला करत ७६ सी.आर.पी.एफ. जवान आणि पोलिसांची हत्या केली.
*२०१२ला झारखंडच्या गुडवा जिल्ह्या जवळ बरिगंवा जंगलात १३ पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली.
*२०१३च्या छत्तीगडच्या सुकुमा जिल्ह्यात कॉंग्रेस नेत्यासहित २७ जणांना नक्षलवाद्यांनी जीवे मारलं
*३ एप्रिल २०२१ला छत्तीगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे २३ जवान शहिद तर ३१ जवान गंभीर जखमी झाले होते.

नक्षलवाद्यांचं अर्थचक्र कसं चालंतं

नक्षलवादी खाणउद्योगाकडून मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करतात. एकूण नफ्याच्या तीन टक्के रक्कम नक्षलवाद्यांना खाणउद्योजकांना द्यावाच लागतो. असं बोललं जातं शिवाय अंमली पदार्थांच्या तस्करीतून नक्षलवादी जबरदस्त पैसा कमवतात. नक्षलवाद्यांना मिळणारा ४० टक्के फंड हा ड्रग्जच्या व्यापारातून मिळतो.

नक्षलवाद्यांच्या खात्म्यासाठी करण्यात आलेल्या प्रमुख कारवाया

ऑपरेशन स्टीपेचलचेस

१९७१मध्ये या ऑपरेशनला सुरुवात झाली होती. यात राज्य सरकरच्या पोलिस विभागासह भारतीय सैन्यानं देखील भाग घेतला होता. यात २० हजार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

ऑपरेशन ग्रीन हंट

ऑपरेशन ग्रीन हंटला २००९मध्ये सुरुवात झाली होती. नक्षलवादीवरोधी या अभियानाच ‘ग्रीन हंट’ हे नाव माध्यमांनी दिलं होतं. पॅरामिलेट्रीसह राष्ट्रीय पोलिसांनी देखील यात सहभाग नोंदवला. हे ऑपरेशन छत्तीगड, झारखंड, आंध्राप्रदेशासह महाराष्ट्रात सुरु होतं.

ऑपरेशन प्रहार

छत्तीसगडच्या चिंतागुफा भागात नक्षलवादी लपल्याची खबर मिळतात ऑपरेशन प्रहारला सुरुवात झाली. ३ जून २०१७ ला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात हे ऑपरेशन सुरु झालं. यात छत्तीसगड पोलिस, जिल्हा राखीव दल आणि भारतीय वायू सेनेच्या ‘अँटी नक्सल फोर्स’ या सुरक्षा बलांनी सहभाग नोंदवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button