सुप्रिया सुळे राज्यपालांना का भेटल्या? : तासभर चर्चा

Governor Bhagat Singh Koshyari - Supriya Sule - Maharashtra Today
Governor Bhagat Singh Koshyari - Supriya Sule - Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन तब्बल एक तास चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी रविवारी राजभवनवर जाऊन राज्यपालांची ही भेट घेतली. बराचवेळ त्या राजभवनवर होत्या. राज्यपालांशी चर्चेनंतर त्यांनी तेथील परिसर थोडावेळ पाहिला आणि तेथील कर्मचाऱ्यांबरोबर फोटोही काढून घेतले.

ही सदिच्छा भेट होती असे राजभवनतर्फे प्रसिद्धी माध्यमांना कळविण्यात आले. मात्र सुप्रियाताई तासभर राज्यपालांशी कोणत्या विषयावर बोलल्या असतील या बाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. सुप्रियातार्इंनी भेटीचा मुहूर्त बरोबर निवडला. काल दिवसभर पाच राज्यांच्या निकालाचीच माध्यमांमध्ये चर्चा होणार हे स्वाभाविक होते. त्यामुळे सुप्रियाताई-राज्यपाल भेटीची फारशी चर्चा माध्यमांमधून झाली नाही.

राज्यपाल हे राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करतात अशी तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गेल्यावर्षी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. त्यानंतर २५ मे २०२० रोजी पवार हे त्यांचे विश्वासू खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यपालांच्या भेटीला गेले होते.

राज्यपाल कोश्यारी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. राज्यपाल हे सातत्याने राज्यातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारला आणि विशेषत: केंद्रीय गृह मंत्रालयाला अवगत करत असतात. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की सुप्रियातार्इंनी राज्यपालांशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत तसेच कोरोनासंदर्भातील परिस्थितीबाबत चर्चा केली. या भेटीत काही राजकीय संकेत त्यांच्याकडून दिले गेले का या बाबत माहिती मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button