वयाच्या २८ व्या वर्षी शेफाली शाहने अक्षय कुमारच्या आईची भूमिका का केली? स्वत: अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

Amitabh Bachchan - Shefali Shah - Akshay Kumar

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शेफाली शाहला (Shefali Shah) तिच्या शानदार अभिनयासाठी ओळखली जाते. लहान वयातच ती रुपेरी पडद्यावर आईची भूमिका साकारत असल्याचे तिने दाखवले. शेफाली शाहने लोकप्रिय शो ‘हसरते मे’ अवघ्या वयाच्या २०व्या वर्षी मध्यमवयीन आईची भूमिका केली होती. ती म्हणते की लहान वयातच अशा भूमिकांसाठी तिला टायपिकास्ट केले होते.

२००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘वक्त’ चित्रपटात शेफालीने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची पत्नी आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आईची भूमिका केली होती. त्यावेळी शेफाली साधारण २८ ते ३० वर्षाची होती.

एका व्र्यत्तवाहिनीशी बोलताना शेफाली शाह म्हणाली, मी अगदी लहान वयात आईच्या भूमिकेसाठी टायपिकास्ट झाले होते. मी त्या विशिष्ट वयातही पोहोचले नव्हते. मी एक कार्यक्रम केला ज्यामध्ये मी वयाच्या २० व्या वर्षी १५ वर्षाच्या मुलाच्या आईची भूमिका केली. आणि मग मी जेव्हा २८-३० वर्षांचा होते तेव्हा मी अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती. शेफालीने सांगितले की स्क्रीन टाइमच्या बाबतीत ती १३३ वर्षांची आहे.

सांगण्यात येते की शेफाली शाह निर्भया घटनेवर आधारित दिल्ली क्राइम या वेब सिरीजमध्ये दिसली होती. नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या या मालिकेत शेफालीने डीसीपी वर्णिका चतुर्वेदीची भूमिका साकारली होती. यामध्ये शेफालीच्या भूमिकेविषयी बरीच चर्चा झाली. मागील महिन्यात या शोने सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरीजचा आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER