राजेश खन्नाची माफी मागावी असे का वाटत होते शत्रुघ्न सिन्हा यांना?

Why did Shatrughan Sinha want to apologize to Rajesh Khanna

बॉलिवूडमध्ये (Bollywood) दोन कलाकार एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात आणि त्यांची ही मैत्री अनेकांच्या असुयेचा विषय होऊ शकते. तर कधी कधी अशी मैत्री दोघांमध्ये अचानक छोट्याशा कारणांवरून दुश्मनीतही बदलली जाऊ शकते. याचे अगदी लक्षात राहाण्यासारखे उदाहरण म्हणजे शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मैत्री. हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. काही सिनेमात हे दोघे एकमेकांचे दुश्मन असलेलेही दाखवले होते. या दोघांचा दोस्ताना सिनेमा हा त्यांच्या या मैत्रीचीच कथा होता. सुरुवातीला मित्र असलेले हे दोघे नंतर दुश्मन होतात. आज या गोष्टीची आठवण येण्याचे कारण म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत राजेश खन्नासोबतच्या (Rajesh Khanna) आठवणी काढताना अमिताभच्या मैत्रीबाबतही वक्तव्ये केली आहेत.

अमिताभच्या मैत्रीबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले, जुन्या गोष्टी विसरून आता पुढे गेले पाहिजे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे हे सिनेमे मी करू शकलो नाही आणि ते सिनेमे अमिताभने केले. ‘शोले’ सिनेमात जयची भूमिका साकारण्यासाठी मला विचारण्यात आले होते. रमेश सिप्पी यांची इच्छा होती की ही भूमिका मी करावी, पण मी दुसऱ्या सिनेमांमध्ये बिझी असल्याने ती भूमिका साकारू शकलो नव्हतो. परंतु आता मला ते सिनेमे न केल्याचा पश्चाताप होत नाही. इंडस्ट्रीत अशा गोष्टी होतच असतात. एखादा प्रोजेक्ट एखाद्या कलाकाराला घेऊन सुरु होतो पण तो कलाकार काही कारणांनी उपलब्ध न झाल्यास दुसऱ्याला घेऊन तो प्रोजेक्ट पूर्ण केला जातो. कधी कधी कलाकार स्वतःच एखादा सिनेमा सोडून देतात. आजही तसेच घडते. परंतु यामुळे कोणाचे संबंध बिघडत नाहीत. रमेश सिप्पी यांच्याशी माझे संबंध आजही चांगले आहेत. अमिताभबाबतही माझ्या मनात आजही प्रेम आणि आदर आहे. मी एवढेच म्हणेन की, ‘छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी.’

राजेश खन्नाबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले, राजेश खन्नासोबत माझा वाद सिनेमांमुळे नाही तर राजकारणामुळे झाला. राजेश खन्ना जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभा होता तेव्हा मी त्याच्या विरोधात निवडणूक लढवणार नव्हतो, पण भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मला निवडणूक लढवण्यास तयार केले. ही गोष्ट मी राजेश खन्नाला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो पण त्याने माझे ऐकलेच नाही. खूप वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. आमच्या दोघांमध्ये बोलणे सुरु झाले पण दूरी कमी झाली नव्हती. मला खरे तर राजेश खन्नाची माफी मागायची होती. तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तेथे जाऊन त्याला भेटून त्याची गळाभेट घेऊन त्याची माफी मागायची होती. पण मी असे करण्यापूर्वीज राजेश खन्नाने या जगाला अलविदा म्हटले होते. याचे मला अजूनही दुःख आहे असेही शत्रुघ्न सिन्हाने सांगितले.

ही बातमी पण वाचा : या गायिकेने फोनवरून गप्पा मारत धर्मेंद्रचा उदासपणा केला दूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER