मसुदा तयार होताना शरद पवार गप्प का बसले? – पाशा पटेल

pasha Patel & Sharad Pawar

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ? पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आहे. दिल्ली येतील शेतकऱ्यांचे आंदोलन भरकटले आहे. ज्यांना शेतकऱ्यांचे हित समजत नाही ते आंदोलनात असल्याची टीका केद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

मांजरा ते गोदावरी नदी अशा ११ नद्यांच्या खोऱ्यात सुमारे पाच हजार किलोमीटरच्या पट्ट्यात बांबू लागवड चळवळीची सुरुवात पाशा पटेल करणार आहेत. याची माहिती देण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर ते म्हणाले, पंजाब व हरियाणा सोडले तर देशभरात कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. प्रातिनिधिक आंदोलने सोडली तर आंदोलनाला जनाधार नाही. दिल्लीत आंदोलन करणारे फक्त आधारभूत किमतीची मागणी करण्यासाठी आले होते. नंतर त्यात राजकारण घुसले आणि मागण्या वाढत गेल्या.

कृषी कायद्यामुळे शेतक-यांचे भलेच होणार आहे. स्पर्धा निर्माण होणार असल्याने पिकाला भाव मिळणार आहे. एकदा लावलेला बांबू शंभर वर्षे उत्पन्न देतो. एकरी आठ हजार रुपये खर्चून सुमारे लाखभर उत्पन्न आणि पर्यावरण वाचविणाऱ्या बांबूची लागवड शेतकऱ्यांनी करावी. यासाठी विविध शासकीय योजनांना लाभ घ्यावा.

बांबू चळवळ राज्यभर चालविणार असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी हे केंद्र सरकारबाबत काय म्हणतात हे गंभीरपणे घेण्याची गरजच नाही. त्यांच्यामागे किती माणसे आहेत? सेना नसलेले ते पती आहेत. त्यांच्यामागे किती लोक आहेत? सदाभाऊ खोत त्यांच्यापासून लांब गेले नसते तर कदाचित ते आजही भाजपसोबत असते, अशी टीका पटेल यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER