‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ काँग्रेसचे उद्यापासून मुंबईत आंदोलन – भाई जगताप

PM Narendra Modi - Bhai Jagtap

मुंबई : ‘मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ आंदोलन काँग्रेस (Congress) उद्या (मंगळवार) पासून मुंबईत करणार आहे. हे आंदोलन ६ दिवस चालेल, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली. यासाठी भाजपाला (BJP) जाब विचारू, असे ते म्हणालेत.

लसीकरण केंद्रांबाहेर १०० कार्यकर्ते करणार आंदोलन

उत्तर मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात लसीकरण केंद्राबाहेर १०० कार्यकर्ते आंदोलन करतील. मास्क घालून मानवी साखळी तयार करतील. पुढील ६ दिवस हा विरोध सुरू राहणार आहे, असे जगताप म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button