बंगलोरचा संघ हिरवी जर्सी घालून का खेळला?

RCB

राॕयल चॕलेंजर्स बंगलोरचा (RCB) संघाचा नेहमीचा पोशाख आहे …लाल रंगाचा…पण रविवारी सीएसकेविरुध्द (CSK)\ ते हिरव्या रंगाच्या (Green Jersey) पोशाखात दिसले. आरसीबीचा संघ 2011 पासून प्रत्येक आयपीएलमध्ये (IPL एक सामना असा हिरवी जर्सी घालून खेळतो पण नेहमीचा पोशाख सोडून ते हिरवी जर्सी का वापरतात?

गेल्या वर्षी ते दिल्लीविरुध्द ग्रीन जर्सी घालून खेळलै होते. गो ग्रीन मोहिमेचा हा एक भाग आहे, त्याद्वारे पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवड व संगोपनाचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ग्लोबल वार्मिंगबाबत जनजागृती आणि पुर्नवापराचा प्रचार करायला प्रोत्साहन देण्याचाही त्यामागे उद्देश आहे. रेड्युस, रिसायकल आणि रियुज याचा संदेश ते या सामन्यातून देतात. त्यासाठी वापरण्यात आलेल्या त्यांच्या हिरव्या जर्सी ह्यासुध्दा रिसायकल्ड प्लास्टिकपासुन बनवलेल्या असतात.

2016 मध्ये सुध्दा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विराट कोहलीचा संघ गुजरातविरुध्द खेळण्यासाठी सायकलीने मैदानावर आला होता. त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी सीएनजीवर चालणाऱ्या रीक्षांची व्यवस्थासुध्दा त्यावेळी केली होती. परंपरेनुसार या विशेष सामन्यावेळी कोहली आपल्या प्रतिस्पर्धी कर्णधाराला एक रोपटेही भेट देत असतो.

या हिरव्या जर्सीसह आरसीबीने 10 सामने खेळले आहेत पण त्यापैकी त्यांना फक्त दोनच जिंकता आले आहेत आणि त्या दोन्ही वेळा आरसीबीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

आरसीबीचे ग्रीन जर्सी सामने

2011- विजय
2012- पराभव
2013- पराभव
2014- पराभव
2015- अनिर्णित
2016- विजय
2017- पराभव
2018- पराभव
2019- पराभव
2020- पराभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER