डेव्हिड वॉर्नरला अश्विन का म्हणाला, ‘अप्पो अन्वर’?

David Warner & Ravichandra Ashwin

ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे सोशल मीडियावर टीकटॉकचे प्रेम सर्वश्रुत आहे. लॉकडाऊनच्या काळीतील आपले टाईमपासचे कितीतरी मजेशीर व्हिडिओ त्याने टिकटॉकवर पोस्ट केले आहेत. मात्र आता भारताने टिकटॉकसह 59 चिनी अँपवर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याने लगेच डेव्हिड वॉर्नरवर निशाणा साधला आहे.

वॉर्नरची खिल्ली उडवताना अश्विनने वॉर्नरला अप्पो अन्वर संबोधले आहे. रजनीकांतचा 1995 मधील सिनेमा ‘बाशा’ मधील हा डायलॉग आहे. त्याचा अर्थ आता काय करणार? असा होतो. तो पकडून अश्विनने वॉर्नरलाच जणू विचारले आहे, आता काय करणार?

अश्विन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर आपले मत मांडून जागरुकता आणण्याचा प्रयत्नसुध्दा सोशल मीडियावर करत असतो. तामिळनाडूत पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या दुकानदार व त्याच्या मुलाच्या विषयावरही त्याने भाष्य केले आहे. त्याने म्हटलेय, ‘प्रत्येक आयुष्य महत्त्वाचे आहे. ह्या क्रुरतेविरोधात त्यांना न्याय मिळायला हवा आणि जयराज व फेनिक्सला न्याय मिळुनही त्याच्या कुटुंबाचे सांत्वन होईल असे मला वाटत नाही पण मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER