अर्णबच्या व्हाट्सअप चॅटचे पाकिस्तानात का पडलेत पडसाद?

अर्णब गोस्वामीची (Arnab Goswami) व्हाट्स अप (WhatsApp) चॅट लिक झाली आणि चारही बाजूतून प्रतिक्रिया यायला सुरु झाली. परत एकदा समर्थन आणि विरोधाचे दोन गट बनलेत. प्रतिक्रिया प्रतिउत्तरं दिली जाताहेत. पण एका प्रतिक्रियेनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करणारी प्रतिक्रिया आलीये पाकिस्तानातून. त्यांच्या पंतप्रधानाकडून.

पुलवाना हल्ला, बालाकोट, सर्जिकल स्ट्राइक अशा गोष्टींचा उल्लेख त्यात आढळतो. या चॅटचे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाल्यानंतर सवाल उठतोय, अर्णबला याची पूर्व कल्पना होती का? क्रिया प्रतिक्रियांच्या फैरी झडत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेल्या ट्विटमुळं वातावरण तापलंय. इम्रान खान अर्णबचा दाखला देत म्हणाले, “राजकीय फायद्यासाठी मोदी सरकारने आतंकवादी हल्ल्यांचा वापर केलाय. एका पत्रकारच्या लिक झालेल्या व्हाट्स अप चॅटनं मोदी सरकार (Modi Government) आणि मिडीयाच्या गैर संबंधांवर प्रकाश टाकलाय. यामुळ मोठी युद्धजन्य परिस्थीती निर्माण करण्यात आली. बालकोट हल्ल्यात पाकिस्तानने एक जबाबदार आणि संतुलित भूमिका घेतली. त्यामुळं मोठं संकट निर्माण होण्यापासून रोखण्यात आलं. आंतरराष्ट्रीय समुदायांनी एकत्र येवून भारताच्या अशा सैनिकी अजेंड्यांना रोखलं पाहिजे. नाहीतर मोदी संपूर्ण काश्मीरला अशा वादग्रस्त परिस्थितीत टाकतील जे रोखण केवळ अशक्य होवून बसेल.”

रिपब्लिक टीव्हीनं दिलं उत्तर

शुक्रवारी चॅट लिक झाली. पण त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देणाऱ्या अर्णबच्या रिपब्लिक टीव्हीनं पाकिस्तानी पंतप्रधानांना प्रतिउत्तर दिलंय. “रिपब्लिक टीव्ही मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी पाकिस्तानच्या अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश केलाय. रिपब्लिकन शोधलेले रिपोर्ट, स्टिंग ऑपरेशन आणि पुरावे असणाऱ्या माहितीमुळं हे पाकिस्तान आतंकवाद्यांच पालन पोषण करुन भारताविरुद्ध वापरत असल्याचं समोर आणलं होतं.”

कशी झाली चॅट लिक?

टीआरपी प्रकरणात छेडछाड केल्याप्रकरणी अर्णबविरोधात ऑक्टोबरमध्ये केस दाखल करण्यात आली होती. इतर कंपन्यासह अर्णबच्या आउटलायर मिडियाला आरोपी बनवण्यात आलं होतं. या प्रकरणात अर्णबच्या व्हाट्स अपकड चॅटची पडताळणी सुरु होती. या दरम्यान मुंबई पोलिसांनी अर्णबविरोधात चार्जशिट दाखल केली होती. यात पार्थो दासगुप्ताचे CEO ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल याच्याशी केलेल्या चॅटिंगमध्ये बालकोट एअर स्ट्राइकच्या तीन दिवसांपूर्वी काही तरी मोठं होणार असल्याचा उल्लेख आहे, अर्णब म्हणतोय, ‘कुछ बडा होनेवाला है.’

दरम्यान महाविकास आघाडीत म्हणजे कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेत आणि रिपब्लिक टिव्ही बऱ्याच मुद्यांवर एकमेकांच्या समोरा समोर आहेत.

रिपब्लिक टीव्ही विरुद्ध महाविकास आघाडी

गेल्यावर्षी एप्रिलच्या १६ तारखेला पालघरच्या गडचिंचले गावात जमावाने दोन साधूंची हत्या केली. चोर असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर बरंच राजकारण तापलं. यावर रिपब्लिकन टीव्हीनं महाराष्ट्र सरकारवर टीकेची भूमिका घेतली होती. त्यामुळं विवाद ताणला गेला होता.

सुशांत आत्महत्या प्रकरणात खुलेआम अर्णबने संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टिका केल्या होत्या. मुख्यमंत्र्‍यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच नाव घेता वारंवार त्यांना घेरण्याच अर्णब या प्रकरणात प्रयत्न करत असल्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध अर्णब गोस्वामी असा सामना रंगला होता.

तुरुंगात केली होती रवानगी

इंटेरिअर डीझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईंनी २०१८ला आत्महत्या करत चिठ्ठीत अर्णबचं नाव लिहलं होतं. त्यामुळं त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांच्यावरही अर्णबने रिपब्लिक भारतला मुद्दमहून त्रास देत असल्याचे आरोप केले होते. वरील प्रकरणांवरुन अर्णब आणि महाविकास आघाडीत असणारा वाद आणि वादामुळं त्याची चॅट लिक केली गेलीये का? असा सवाल केला जातोय.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER