बॉलीवूड संगिताचे सम्राट गुलशन कुमार यांना अबू सलेमनं का मारलं ?

Gulshan Kumar

गुलशन कुमार (Gulshan Kumar) दिल्लीतील एक सामान्य ज्युस विक्रेता ज्याने काळाची पावलं ओळखत टी सिरीज (T-series) नावाचं साम्राज्य उभा केलं. ९० च्या दशकात गाजलेल्या प्रत्येक गाण्या मागं हे नावं आहे.

भजन संगीत ते बॉलीवूड (Bollywood) अल्बम, ज्यूस विक्रेता ते टी सिरीजचा मालक. गुलशन कुमार यांच आयुष्य जितकं संघर्षाचं राहिलं तितकाच करुण अंत त्यांचा झाला. अनुराधा पौडवालांच्या रुपात नवी लता मंगेशकर आणि भाऊ किशन कुमारच्या (Kishan Kumar)रुपात दिलीप कुमारांना मागे टाकत नवा ट्रॅजेडी किंग देवू पाहणाऱ्या महत्त्वकांक्षी व्यावसायिकाची ही अधुरी कहाणी.

आता कॅसेटचा जमाना आलायं…

ही गोष्ट आहे १९७० च्या दशकातली, जुन्या दिल्लीतली. गोल चेहरा, काळे कुरळे केस आणि मोठी स्वप्न भरलेले छोटे डोळे भोवतालचं निरीक्षण करत होते. एकचं गाणं भरलेली तबकडी यंत्रावर ठेवून संगीताचा आनंद देणारा ग्रामोफोन आता कालबाह्य होत चाललाय आणि कॅसेट नावाच प्रकार लोकप्रिय होतोय. त्याने ठरवलं आता ज्यूसचा व्यवसाय बंद करायचा आणि कॅसेट विक्रीला सुरुवात करायची.

काळाची पावलं वेळेत ओळखलेल्या या युवकानं छोटेखानी कॅसेट्सचं दुकान टाकलं. आणि काही दिवसातचं मिळालेल्या नफ्यातून त्यानं छोटेखानी स्टुडीओ उभारला ज्यात संगीत क्षेत्रातील उद्याची मोठी नावं घडणारं होती. या स्टुडीओ मालकाचं नाव होतं गुलशन कुमार.

भजन ते बॉलीवूड

१९८० चं दशक. रामायण ही टिव्ही सिरीयल प्रचंड लोकप्रिय होती. देशभरात भक्तीमय वातावरण होत आणि यातच गुलशन कुमार यांनी भजन गाण्यासाठी अनूराधा पौडवाल, कुमार सानू, सोनू निगम यांच्या स्ट्रग्लींग पिरिअडमध्ये संधी दिली.

सिनेमातील गाण्याच्या चालीवर राम कृष्णांची भजन यांच्या आवाजात रेकॉर्ड होवून बाजारात कॅसेट्स तुफान विकली जावू लागली. गुलशन कुमारांची टी सिरीज म्युजीक कंपनी संगीत क्षेत्रात ब्रँड म्हणून नावारुपाला आली.

भजना गीतांची कॅसेट कंपनी लवकरचं बॉलीवूड आपल्या ताब्यात घेणार होती

टी सिरिज

त्याकाळात किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील कॅसेट्स ४० रुपयाला विकली जायची. सामान्यांच्या खिशाला हा दर परवडणारा नव्हता. यात गुलशन कुमार यांनी संधी शोधली. या सर्व गायकांच्या गाण्यांचे कॉपी राइट्स गुलशन कुमारांनी विकत घेतली.

कुमार सानूंनी किशोर कुमार, सोनू निगमने रफी तर अनुराध पौडवालांच्या आवाजात लता मंगेशकरांची हुबेहुब त्याच आवाजात गाणी रेकॉर्ड केली आणि ‘टी सिरीज’ या कॅसेट्सची किंमत ठेवली मात्र १० दहा रुपये.

या कॅसेट्सनी टी सिरीजला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. आणि वर्षभरातचं टी सिरीजची वार्षिक उलाढाल ३५० करोड रुपये. ९० च्या दशकातील ही उलाढाल आजच्या प्रमाणे पाहिली तर हजारो करोडोंच्या घरात जाते.

आशिकी

यानंतर टी सिरीजने ‘लाल दुपट्टा मलमल का’ या चित्रपटांसाठीच्या गाण्याची निर्मिती केली. सिनेमा आपटला पण गाण्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली.

गुलशन कुमार मुंबईत आले होते. ‘आशिकी’ या गाण्याचा अल्बम प्रसिद्ध झाला आणि त्याला भारतात अक्षरक्षा लोकांनी डोक्यावर घेतलं ते आजवर उतरवलं नाही. एकापाठोपाठ हिट अल्बमची, सिनेमा गितांची त्यांनी निर्मीती केली.

टी सिरीजचनं पाहता पाहता अक्खी म्युजीक इंडस्ट्री ताब्यात घेतली. त्यावेळी एकट्या टी सिरीजकडे या इंडस्ट्रीतले ६५ % शेअर होते. अक्षरशः पैशाच्या राशीत खेळणाऱ्या गुलशन कुमारांवर नजर पडली मुंबई अंडरवर्डची.

अबू सलेमने (Abu Salem) मागीतली खंडणी

९० च्या दशकातील बॉलीवूड आणि गँगस्ट यांच्या संबंधाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. कधी हे लोकं मोठ्या सेलिब्रेटींना धमकावून पैसा ही उकळायची. दाऊत इब्राहिम गँगच्या अबू सलेमने ही गुलशन कुमार यांना १० करोड रुपयांची खंडणी मागितली. ती गुलशन कुमारांनी दिली. पण हा स्टोरीचा एंड नव्हता. यात विलन ठरलेलं नावं होतं संगीतकार श्रवण- नदीम जोडीतील ‘नदीम’.

ज्या आशिकी अल्बमला नदीम- श्रवणने संगीत दिलं त्याचा पुढं चित्रपट ही आला. नदीम- श्रवण हे नावही गाजलं. नंतरच्या काळात नदीमने स्वतःच्या आवाजात एक अल्बम रेकॉर्ड केला आणि तो टी सिरीजनं प्रमोट करावा अशी गुलशन कुमारांना विनंती केली. पण गुलशन कुमार टाळाटाळ करत राहिले.

ऑगस्ट १९९७

अबू सलेमचं १९९३ च्या मुंबई बॉंब ब्लास्टमध्ये नाव आल्यानंतर तो दुबईला पळाला. त्याचे आणि नदीमचे चांगले संबंध होते. ५ ऑगस्ट १९९७ ला त्याने गुलशन कुमारांना फोन करुन खंडणीचा दुसरा हप्ता मागितला होता तेव्हा त्याने नदीमचा अल्बम का प्रमोट करतं नाही हे विचारल्याचं पोलिस रेकॉर्डमध्ये आहे. आणि नंतर १२ ऑगस्ट १९९७ ला गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

यांच्यावर होता संशय

नदीमचा अल्बम प्रमोट केला नसल्याने नदीमने त्यांची सुपारी दिली अशी चर्चा असतानाचं टी सिरीजचे प्रतिस्पर्धक टिप्स म्युजीकचे मालकं रमेश तोरानी यांनी प्रतिस्पर्ध्याला संपवण्याची सुपारी दिल्याचे ही बोललं गेलं कारण याचं ऑगस्टमध्ये रमेश तोरानीने अबू सलेमच्या माणसाला पन्नास लाख रुपये दिले होते. ती खंडणी होती का सुपारी हे स्पष्ट न झाल्याने रमेश तोरानींची पुढं सुटका झाली.

अबू सलेमला अटक होवूनही या केसवर चालवला गेला नाही खटला.

गुलशन कुमारांच्या हत्येत सहभागी तिन्ही शुटर्सना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही हत्या कोणाच्या तरी सांगण्यावरुन केली असल्याने कोर्टाने त्यांना फाशी देता येणार नाही असं कोर्टाने निकालात म्हणटलं होतं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अबू सलेम याला पोर्तुगीजमध्ये २००२ ला अटक करण्यात आली आणि त्याला भारताकडे हस्तांतर करताना फाशीची शिक्षा होणार नाही आणि २२ वर्षाहून अधिक तुरुंगात ठेवता येणार नाही या पोर्तुगीज सरकारच्या अटी भारत सरकारने मान्य केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER