जाणून घ्या चेन्नईच्या १८८ धावा का आहेत खास?

Maharashtra Today

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) चांगली कामगिरी करत आहे आणि त्यांच्या शेवटपर्यंत असलेल्या फलंदाजी फळीची चर्चा आहे. खोलवर फलंदाजी म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) त्यांनी नवव्या क्रमांकावर ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) खेळवले, ज्याच्या नावावर टी-२० मध्ये सहा हजारांवर धावा आहेत. एवढ्या धावा करणाऱ्या फलंदाजाला ते नवव्या क्रमांकावर खेळवत असतील तर तुम्ही कल्पना करू शकता.

त्यांच्या या खोलवर फलंदाजीची ताकद सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिसून आली, जेव्हा त्यांनी ९ बाद १८८ धावा केल्या आणि यात सर्वाधिक योगदान होते ते फक्त ३३ धावांचे. एकही अर्धशतक नाही. सलामीवीर फाफ डू प्लेसीसने या ३३ धावा केल्या. इतर सर्वांच्या धावा ३३ पेक्षा कमीच राहिल्या. तरी त्यांनी १८८ पर्यंत मजल मारली. याचा अर्थ फलंदाजीत जवळपास प्रत्येकानेच योगदान दिले. डू प्लेसीसशिवाय मोईन अलीने २६, सुरेश रैनाने १८, अंबाती रायुडूने २७, महेंद्रसिंग धोनीने १८, सॕम करनने १३ आणि अगदी नवव्या क्रमांकावर खेळलेल्या ड्वेन ब्राव्होने २० धावा केल्या. त्यामुळेच डावात ३३ धावांची सर्वोच्च खेळी असूनही त्यांनी १८८ धावांपर्यंत मजल मारली.

टी-२० सामन्यात कोणत्याही फलंदाजाच्या ३३ पेक्षा जास्त धावा नसलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापेक्षा अधिक धावा दक्षिण आफ्रिकेतील सुपर स्पोर्ट स्पर्धेत डॉल्फिन्स संघाने केलेल्या ७ बाद १९१ धावा होत्या, ज्या त्यांनी २००६ मध्ये लायन्स संघाविरुद्ध केल्या होत्या. डॉल्फिन्सच्या त्या डावात जोन केंटच्या नाबाद ३२ धावा ही सर्वोच्च खेळी होती. त्यापेक्षा अधिक धावा कुणाच्याच नव्हत्या. रोबी फ्रायलिंक व कायल स्मीटने २९, अहमद एमियाने २८ व डग वाॕटसनने २६ धावा केल्या होत्या आणि डॉल्फिन्सने तीन गडी राखून तो सामना जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button