म्ह्णून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींकडे मुलं होतात आकर्षित !

priyanka-nick

हल्लीची पिढी एकमेकांवर प्रेम करतांना वयामधल्या अंतराला फारसे महत्व देत नाही. दोघांमध्ये प्रेम आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणत्याही वयाचे जोडपे आनंदी राहू शकते. त्यात मुलगी मोठी असेल तर हमखास ते नाते दीर्घ काळापर्यंत टिकून राहते. म्हणूनच अभिषेक-ऐश्वर्या, प्रियंका-निक ही जोडपी आजकाल आदर्श ठरत आहेत. वयाने मोठ्या स्त्रिया मुलांची जास्त काळजी घेतात, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, सेक्स दरम्यानही त्या पुढाकार घेऊन मुलांचा इच्छा पूर्ण करतात. बहुतांश मुलांना वयाने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. सहसा मुले ही गोष्ट ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, मात्र हे सत्य आहे. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलींची मॅच्युरिटी मुलांना आवडते. तुम्हीही जर अशा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला असाल तर त्यात काही गैर नाही. मात्र या आकर्षणामागचे नेमके कारण काय आहे जाणून घेऊया.

matured girl जबाबदारीची जाणीव : वयाने मोठ्या असलेल्या मुलींना जबाबदारीची जाणीव असते. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे ओळखून, आपल्या गरजा समजून घेऊन त्या पाऊल टाकतात. आपल्या जोडीदाराकडेही त्या असेच लक्ष देतात. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात.

आर्थिकदृष्ट्या सक्षम : मुलांना मुलींवर खर्च करायला आवडते, मात्र मुलांप्रमाणे मुलीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर दोघे मिळून खर्च विभागू शकतील. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे मुली इंडिपेंडेंट बनतात आणि पैशांचं योग्य ते महत्व त्यांना कळते, ही गोष्ट मुलांना आवडते.

ही बातमी पण वाचा : चार चौघात असतानाही ‘ती’ होईल तुमच्याकडे आकर्षित

relationसेक्समध्ये अनुभवी : सेक्सच्या बाबतीत वयाने मोठ्या असलेल्या मुली फार उतावीळ नसतात. आपल्या जोडीदाराला समजून घेऊन, त्याच्या इच्छेचा विचार करून त्या स्वतः सेक्समध्ये पुढाकार घेतात. हीच गोष्ट मुलांना आवडते, कारण त्यांना गाईड करणारे कोणी हवे असते. तसेच सेक्सच्या बाबतीत मुली जास्त अनुभवी असतात त्यामुळे त्यांना ती नाजूक वेळ कशी हाताळावी हे समजते.

कमी दिखावा : जसे जसे वय वाढते तसे दिखावा करण्याचे प्रमाण कमी होत जाते. वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये साधे राहणे, कमी मेकअप करणे, स्टायलिश पण सिलेक्टीव्ह गोष्टी घेणे असे बदल होतात. त्यांच्या याच गोष्टी मुलांना अधिक भावतात कारण मुलांना सहसा शोऑफ करणे आवडत नाही.

ही बातमी पण वाचा : मुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..