८० हजार फेक अकाउंट्सवर भाजप प्रवक्ते राम कदम गप्प का? राष्ट्रवादीचा सवाल

Mahesh Tapse & Ram Kadam

मुंबई : सुशांत सिंह रजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणी ही आत्महत्या नसून  हत्याच आहे, असे वारंवार राम कदम (Ram Kadam) मीडियावर सांगत होते. शिवाय भाजपाचे (BJP) अनेक बडे नेते मुंबई पोलिसांवर व त्यांच्या तपासावर अविश्वास दाखवत होते. मात्र आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने फेसबुक आणि ट्विटरवरील ८० हजार फेक अकाउंट्स  उघड केल्यानंतर महाविकास आघाडीला सतत बदनाम करणारे भाजपचे प्रवक्ते राम कदम आता गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapse) यांनी केला आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यूमागे महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मंत्री व नेते आहेत म्हणून मुंबई पोलीस कुणाचा तरी बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला होता.  याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे. मात्र एम्सने सुशांत सिंहची आत्महत्याच होती हे जाहीर केल्यानंतर भाजपच्या आरोपाची हवाच निघून गेली आहे.

त्यातच मुंबई पोलिसांनी नुकतीच फेसबुक आणि ट्विटरवर ८० हजार फेक अकाउंट्स उघडकीस आणली आहेत. यामागे भाजपाचे षडयंत्र होते हे आता उघड झाले आहे. सुशांतची हत्या झाल्याचे बोलणारे नेते ८० हजार फेक अकाउंट्सवर आता तोंडावर पट्टी बांधून का? की अजून ते त्याच वक्तव्यावर ठाम आहेत हे स्पष्ट करावे, असे आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER