सलग चार कसोटी जिंकूनही बाबर आझम का होतोय ट्रोल?

Babar Azam

पाकिस्तानने (Pakistan) झिम्बाब्वेविरुध्दचा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि 147 धावांनी जिंकला. यासह त्यांनी दोन सामन्यांची ही मालिकासुध्दा 2-0 अशी जिंकली. कर्णधार म्हणून बाबर आझम (Babar Azam) त्यांच्यासाठी यश घेऊन आला. बाबरच्या नेतृत्वातील पहिले चारही सामने पाकिस्तानने जिंकले आहेत आणि असे करताना त्यांनी सलग दोन मालिकासुध्दा 2-0 अशा व्हाईटवॉशने जिंकल्या आहेत. झिम्बाब्वेच्या आधी दक्षिण आफ्रिकेविरुध्दची मालिकासुध्दा पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली होती. आपल्या पहिल्या दोन मालिका व्हाईटवॉशने जिंकणारा बाबर हा जगातील पहिलाच कर्णधार आहे. आणि कर्णधार म्हणून पहिले चारही कसोटी सामने जिंकणारा तो पहिलाच पाकिस्तानी आहे. याच्याआधी एकाही पाकिस्तानी खेळाडूला कर्णधार म्हणून पदार्पणात दोन पेक्षा अधिक सामने जिंकता आलेले नव्हते.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातही बाबरच्या आधी केवळ असे सातच कर्णधार झालेत ज्यांनी आपले पहिले चार कसोटी सामने जिंकले होते. मात्र असे यश मिळवूनही बाबर आझमचे कौतुक होण्याऐवजी तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय कारण पाकिस्तानने मिळवलेले हे यश लिंबू-टिंबू संघांविरुध्द आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघसुध्दा हल्ली फारच कमजोर असल्याने दुय्यम दर्जाचाच मानला जातो आणि झिम्बाब्वेच्या संघाला तर कुणी गिणतीतही धरत नाही. त्यामुळे अशा संघांविरुध्द पाकिस्तानने आणि बाबर आझमने चार सामने जिंकले म्हणजे काही फार मोठा तीर नाही मारला असे क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा तगड्या संघाविरुध्द खेळून जिंकून दाखव तर मानू, असे आव्हानही काहींनी बाबरला दिले आहे.

अशाच पध्दतीने पाकिस्तानने आणखी पुढच्या मालिका अफगणिस्तान, आयर्लंड वा श्रीलंकेविरुध्द खेळल्या तर बाबर आझमचा हा विक्रम 6 ते 8 कसोटी सामन्यांपर्यंतही वाढेल यात नवल नाही अशीही शेरेबाजी क्रिकेटप्रेमींनी केली आहे.

ते काहीही असो, पण विक्रमांच्या नोंदीत मात्र पहिले चारही कसोटी सामने जिंकणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार अशी बाबर आझमची नोंद झाली आहे.

पहिले चार किंवा अधिक सामने जिंकणारे कर्णधार

9- पर्सी चॕपमन (इंग्लंड) : 1926 ते 1930
8- वॉर्विक आर्मस्ट्राँग (ऑस्ट्रेलिया) : 1920 ते 1921
4- डब्ल्यू. जी. ग्रेस (इंग्लंड) : 1888 ते 1890
4- लाॕर्ड हाॕक (इंग्लंड): 1896 ते 1899
4- ब्रायन क्लोज (इंग्लंड): 1966 ते 1967
4- अली बाकर (दक्षिण आफ्रिका): 1970
4- महेंद्रसिंग धोनी (भारत): 2008
4- बाबर आझम (पाकिस्तान): 2021

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानी गोलंदाजांचा ‘हा’ विक्रम कसोटी सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button