बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराबाबत गप्प का ? प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला टोमणा

Pravin Darekar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसची (Trinamool Congress) सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. निवडणूक निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणे, लूटमार होते आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला – बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत!

दरेकर यांनी ट्विट केले – ‘विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मूग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?’

‘बंगालमध्ये भाजपाकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पण आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!’ असे ट्विटही दरेकर यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले होते ममताला वाघिणी
“ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल…” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button