राठोडांच्या राजीनाम्यानंतर ‘धनंजय मुंडें वाचले’ अशा का होत आहेत चर्चा?

Dhananjay Munde - Sanjay Rathod

शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय राठोडांनी (Sanjay Rathod) अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुण्यात पुजा चव्हाण (Pooja Chavan) नावच्या तरुणीन आत्महत्या केली. त्यानंतर व्हायर झालेल्या ऑडीयो क्लिप आणि फोटोंचा आधार घेत संजय राठोडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. पंधरा दिवस संजय राठोड नॉट रिचेबल होते. शेवटी ते माध्यमाच्या समोर आले पण त्याआधी त्यांनी वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी या मंदिरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं. वंजारा समाजातून येणाऱ्या संजय राठोडांना समाजाचा पुर्ण पाठिंबा असल्याच त्यांना जाहीर करायचं होतं की काय? असे प्रश्न विचारले जावू लागले.

या प्रकरणात चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली आणि संजय राठोडांचा राजीनामा मिळाल्यानंतर त्या शांत झाल्या. काही महिन्यापूर्वी जानेवारीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देखील अशा प्रकरणात अडकेल असता. शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांची पाठराखण केली. यानंतर काही दिवसातच आरोपकर्त्या महिलेने आरोप मागे घेतले. प्रकरण शांत झालं अस वातावरण निर्माण झालं असतानाच पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

शिवसेनेच्या संजय राठोडांनी राजीनामा दिला पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यातून निसटले याला कारणीभूत पुढिल गोष्टी आहेत.

शक्ती प्रदर्शन

पुजा चव्हाणच्या आत्महत्येत संजय राठोड यांच नाव पुढं आलं आणि राठोड अज्ञातवासात गेले. त्यांनी माध्यमांसमोर येवून कोणत्याच प्रकराच स्पष्टीकरण या प्रकरणी दिलं नाही. नंतर १५ दिवसांनी त्यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी या ठिकाणाला भेट दिली. बंजारा समाजाची काशी अशी पोहरादेवीची ओळख आहे.

संजय रोठोत तर इथे आलेच पण त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते तिथं जमले होते. अदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह येवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन तर केलेच होते सोबतच “कोरोना हाताबाहेर गेला तर लॉकडाऊन करावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका.” असं सांगितलं होतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करत हजारोह कार्यकर्ते जमवणाऱ्या संजय राठोडांवर कारवाईचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत समस्त बंजारा समाज आमच्या पाठीशी आहे असं सांगण्याचा राठोडांचा प्रयत्न होता.

अशा गंभीर आरोपांपासून वाचण्यासाठी समाजाची केलेली ढाल उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पटली नाही. त्यातून जाणाऱ्या चुकिच्या संदेशाची मुख्यमंत्र्यांना कल्पना होती. असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे पहिल्यादिवसापासून माध्यमांच्या समोर होते. करुणा शर्मासोबत त्यांचे असणारे संबंधाची कबूली देत रेणू शर्माच्या आरोपाचे खंडन ही केलं होतं. शिवाय पुजा चव्हाणांच्या आत्महत्येमुळं या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं.

नॉट रिचेबल संजय राठोड

पुजानं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आत्महत्या केली. यानंतर काही तासातच पुजा चव्हाण आणि संजय राठोड यांची ऑडीओ क्लिप आणि फोटोज सोशल मिडीयावर व्हायर झाले. या ऑडीयो क्लिप फोन संभाषणाच्या होत्या. यातला आवाज संजय राठोडांचा आहे असं सांगितलं जावू लागलं. यामुळं संजय राठोडांच्या चौकशीची मागणी जोर धरु लागली.

संजय राठोडांवर आरोप होत होते. आणि यावर उत्तर द्यायला ते समोर आलेच नाहीत. कित्येक दिवस त्यांचा फोन बंद होता. संपर्क होणं कठिण. यामुळं संजय राठोड फरार झालेत या चर्चेलाही उत आला होता.

नाव न घेता भाजप आधी टिका करत होती. संजय राठोड नॉट रिचेबल गेल्याचे बघून भाजपच्या चित्रा वाघांनी त्यांच्यावर थेट टिकेची राळ उठवली.

या उलट परिस्थीती धनंजय मुंडे प्रकरणाची होती. धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर येवून माध्यमांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली होती. विरोधकांच्या धनंजय मुंडेंवरुन एकी नव्हती. एकीकडं चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील, प्रवीण देरकरांनी धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांनी या मुद्द्यावर मौन बाळगणच पसंद केल.

आक्रमक चित्रा वाघ

संजय राठोड यांच्या नावाची चर्चा असताना. ऑडीओ क्लिप आणि फोटोज व्हारल होत असताना पोलिसांनी संजय राठोडांना बेड्या ठोकणं तर दुर पण साधी तक्रार देखील नोंदवून घेतला नाही. सुमो मोटोचा आधार घेवून पोलिसांनी तक्रार नोंदवायला हवी होती अशी आक्रामक भूमिका भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची होती.

संजय राठोडांनी झालेल्या आरोपांबद्दल आणि ऑडीओ क्लिप्सबद्दल स्पष्टीकरण देणं गरजेच होतं. ते फरार झाल्याने भाजप अधिक आक्रमक होती. चित्रा वाघांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. पोलिसांच्या भूमिकेवर संशय असल्याचाही त्यांनी आरोप केला. यामुळं प्रकरण चांगलचं तापलं होतं.

मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिमा

शिवसेनेची सत्ता येवून पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातला व्यक्ती मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची स्वच्छ प्रतिमा निर्माण केलीये. अशा प्रकरणांमुळं त्यांची इमेज डॅमेज झाली असती. शिवया वाशिम आणि यवतमाळमध्ये शिवसेनेला यामुळं नुकसान होईल याची कल्पना त्यांना होती. पण राज्यभरात मोठा फटका बसेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात अशी परिस्थीती नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER