धनंजय मुंडे प्रकरणावर महाविकास आघाडीच्या महिला का आहेत गप्प?

Dhananjay Munde

धनंजय पंडीतराव मुंडे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, त्यांच्यावर बलात्काराचे (Crime) आरोप झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला. टिका टिप्पणी करणाऱ्यांच्या नावाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा होतीये या प्रकरणावर मौन बाळगणाऱ्यांची.

महाविकास आघाडीतल्या (Mahavikas Aghadi) महिला नेत्यांना या प्रकरणावर पक्षपाती भूमिका घेतलीये का? असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. राज्यात महिला अत्याचार, महिलांचे हक्क, महिला धोरण अशा विविध विषयांवर सातत्याने बोलणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला नेत्या मात्र बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडेंवरती (Dhananjay Munde) बोलणं टाळताहेत.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी आरोप केलाय की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महिला नेत्या या प्रकरणाकडे मुद्दा दुर्लक्ष करताहेत. त्यांची भूमिका योग्य नाहीये. “धनंजय मुंडेंवर एका महिलेने बलात्कारासारखे गंभीर आरोप केलत. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या एकाही महिला नेत्याने प्रतिक्रिया देण्याच टाळणं हे खेदजनक असून त्यांचं दुपटप्पी धोरण आहे.” हे सांगतानाच महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या सुप्रीया सुळेंना त्यांनी प्रश्न करत,” मग या महिला नेत्या कुठं हरवल्या आहेत का?” असा प्रश्न केलाय?

या प्रकरणानं नंतर वेगळ वळण घेतलं.

“आपल्या पक्षातील नेत्यांवर आरोप झाले की महिला सक्षमीकरण, महिला अत्याचार असे विषय सोयीस्कररीत्या विसरायचे आणि केवळ विरोधी पक्षातील नेता असल्यास आंदोलन करायचे हे चुकीचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली तर दुसऱ्या बाजूला हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसलं.  जेव्हा भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी पिडीत महिलेवर तक्रार केली आहे. त्यामुळं सदर प्रकरण वेगळं वळण घेईल का? असा प्रश्न उपस्थीत होतो.

महाविकास आघाडीच्या नेत्या गप्प का?

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), जेष्ठ नेत्या विद्याताई चव्हाण, रुपाल चाकणकर, महिला व बालकल्याणमंत्री आणि कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gayakwad), विधानपरिषदेच्या उपसभापति, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे, प्रियंका चतुर्वेदी, महाविकास आघाडीतल्या नेत्या महिला अत्याचाराविरोधात हिरीरीने भूमिका घेताना दिसायच्या. पण या प्रकरणी त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष  मेहबूब शेख यांच्यावरही अशा प्रकारचे आरोप  गेल्या काही दिवसापूर्वी झाले होते. त्यावेळ नूकताच शक्ती कायदा सभागृहात मांडला होता. भाजपच्या चित्रा वाघ यांनी. “सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा आणि सामान्यांसाठी वेगळा कायदा राज्यात अस्तित्त्वात आहे का? असा सवला केला होता.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर प्रदेशउपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या “पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. कितीही मोठा नेता असला तरी दोषींना पाठीशी घालू नये. संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले पाहिजे.”

“अशा घटनांमध्ये पीडित आणि तिच्या कुटुंबावर दबाव येऊ शकतो. पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते. आरोप नष्ट होऊ शकतात. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदावरून पायऊतार व्हावे,”  अशी मागणी करत भाजप महिला मोर्चाकडून १८ जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केलीये. धनंजय मुंडें राजीनामा देऊपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचं ही त्यांनी सांगितलंय.

महिला आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त

महिला अत्याचारविरोधात कारवाई व्हावी. पिडीतांना न्याय मिळावा म्हणून महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे.

पिडीतांचे प्रश्न ऐकले जावेत. त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER