रमजान ईद दरवर्षी 11 दिवसांनी मागे जाते ; मुस्लीम चांद्र कॅलेंडरने सांगितले कारण

Ramadan

मुंबई : रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रमजान ईद तीन दिवसांवर आली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा इद साजरी करताना अनेक निर्बंध पाळून ईदचा सण सुरक्षीत साजरा करावा लागणार आहे. मुस्लिम बांधवांचा जिव्हाळ्याचा सण ईद बांधव दरवर्षी मोठ्य़ा हर्षोल्हासात साजरा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, इंग्रजी कॉलेंडरनुसार ईद हा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे जात असतो.

ईद हा सण कधी पावसाळ्यात, कधी हिवाळ्यात तर कधी उन्हाळ्यात असा दरवर्षी ऋतू बदलत असतो. यामागे वैज्ञानिक कारण आहे. चंद्राचे पृथ्वीभोवतीच्या फे-यांचे गणिताशी याचा संबंध आहे. तसेच, चाद्र दिनदर्शिका आणि सौरदिनदर्शिका याप्रमाणे ईद अकरा दिवस मागे जात असते.

ही बातमी पण वाचा:- आंतरराष्ट्रीय चहा दिवस: संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देण्यामागचे कारण

कारण, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणतः 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.

हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे 12 महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ 29.5 दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ 354 दिवस असतात.

तर, सौर कॅलेंडरमध्ये मात्र 365 दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा (365-354) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईदचा सण 11 दिवसांनी मागे येतो. असे विश्लेषणात्मक वृत्त बीबीसी मराठीने दिले आहे.

तर, याउलट हिंदूंचे सण दरवर्षी ठराविक ऋतूतच का येतात तर, “हिंदू कालगणनेने चांद्र आणि सूर्य कॅलेंडरचा दोघांचा मेळ घातला व दोन मिळून हिंदू धर्मियांनी Lunisolar कॅलेंडरचा स्वीकार केला आहे असे खगोल आणि पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी बीबीसीला सांगितले.

हिंदूंचा अधिक महिना –

चांद्र वर्ष आणि सौरवर्षातला 11 दिवसांचा फरक दर तीन वर्षांनी कॅलेंडरमध्ये अधिक महिन्याने भरून काढला जातो.

म्हणजेच थोडक्यात असे अनुशेषाच्या 11 दिवसांचे 33 दिवस साठले की अधिक महिना येतो.

“ज्यावेळेस एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो तेव्हा त्यातल्या पहिल्या महिन्यास अधिकमास आणि दुसऱ्याला निजमास म्हटलं जातं. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो”, असं सोमण यांनी सांगितले.

सौजन्य बीबीसी मराठी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला