लष्करात अधिकारी आणि सैनिकांचे भोजन वेगळे का? शरद पवार, राहुल गांधींचा प्रश्न

Sharad Pawar - Bipin Rawat - Rahul Gandhi

नवी दिल्ली :- संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीची शुक्रवारी बैठक झाली आणि संरक्षण  प्रमुख बिपीन रावत यांनी त्यांची माहिती दिली. माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि कॉंग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या चर्चेत भाग घेतला.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांनी लडाखमधील (Ladakh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्य:स्थितीवर एका ‘प्रेझेंटेशन’ची मागणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या मागणीची दखल घेतली गेली असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लष्कराचे सैनिक आणि सशस्त्र दलाचे अधिकारी यांचे भोजन वेगवेगळे का आहे? असा प्रश्न या बैठकीत शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

या दोन्ही नेत्यांच्या प्रश्नाला संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. ग्रामीण भागातून आलेल्या जवानांच्या भोजनाच्या सवयी आणि स्वाद अधिकाऱ्यांच्या तुलनेत वेगळ्या असतात. बहुतेक अधिकारी हे शहरी भागातून आलेले असतात. असे असले तरी जवान आणि अधिकाऱ्यांना वाढण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेत कोणताही फरक नाही, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांनी ड्रग्जच्या प्रश्नावरुन मुंबई पोलिसांना दिला सल्ला  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER