आघाडीच्या नेत्यांवर आरोप होत असताना पवार आणि ठाकरे गप्प का? : किरीट सोमय्या

Kirit Somaiya-Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे (Kirit Somaiya) यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सकारमधील मंत्री आणि नेत्यांची विविध प्रकरणं यावरुन किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काही नेते ईडीच्या फेऱ्यात अडकत आहेत. सध्या काही नेत्यांचे नातेवाईक एनसीबीच्या रडारवर आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जावई समीर खान यांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या सर्व प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे गप्प का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीनं पाठवलेले समन्स यावरुन देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडेच्यावर एका तरुणीनं बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांवर बंगले लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER