‘लेटरबॉम्ब’ कश्यासाठी, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने केला हा दावा

Ravikant Varpe - parambir singh - maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बवर अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. सिंग यांचे बोलविते धनी कुणी आहे का? असा प्रश्नही सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहेत. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी नवाच गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.

रविकांत वरपे यांनी एक ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. लेटरबॉम्ब कट कसा जन्माला आला? परमबीर सिंगांची पत्नी काही कंपन्यांत भागीदार आहेत. पोलीसांकडून टीआरपी घोटाळ्याची चौकशी सुरू होताच एका कंपनीला ईडीची नोटीस आली. मग विदर्भातील नातेवाईक आमदाराद्वारे सिंगांनी महाराष्ट्र ‘विरोधी’ नेत्याची आणि दिल्ली‘शहां’ची भेट घेतली. तूर्तास एवढेच, बाकी लवकरच!, असं ट्विट वरपे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER