राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावे : नाना पटोले; थोरात म्हणतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

sanjay raut - balasaheb thorat - nana patole - Maharastra Today

मुंबई : मोदी सरकारविरोधात यूपीएला बळकट करायचे असेल, तर त्यांचे नेतृत्व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे द्या, अशी मागणी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. काँग्रेसने (Congress) राऊत यांची ही मागणी फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊत कुणाचे प्रवक्ते आहेत, हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. तर राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

राऊत काय म्हणाले?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवले. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाले. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. मात्र, सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही. देशात इतर घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांचे म्हणणे आहे. अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत, अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

पटोले म्हणतात

“नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कोणाला पाठिंबा द्यावा, हे ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत. संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत, ते आधी त्यांनी जाहीर करावे, मग आम्ही त्यावर बोलू.” असे पटोले म्हणाले.

त्याकडे दुर्लक्ष करा

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राऊत यांच्या मागणीला फटकारले आहे. यूपीए-२ नाही तर एकच राहणार आहे. राऊतांनी काँग्रेसवर बोलण्याची गरज नाही. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसने अनेक चढउतार पाहीले आहेत. आज कठिण दिवस असले, तरी काँग्रेसला चांगले दिवस येतील. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करतील. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER