वीज बिल माफीसाठी कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन ? मनसे – भाजपवर राऊतांचा निशाणा

Sanjay Raut

नवी दिल्ली : वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे पाहून आता यासाठी मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप – मनसेवर निशाणा साधला आहे.

ऊर्जा विभागातील थकबाकीला भाजप सरकारच जबाबदार असल्याचं सांगत कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन होत आहे? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे. (sanjay raut slams bjp and mns over power bill issue) मागील सरकारच ऊर्जा विभागातील थकबाकीला जबाबदार आहे. परंतु, आम्ही केवळ आरोप करणाऱ्यांपैकी नाही.

थकबाकी वसूल झाली तर जनतेला नक्की दिलासा देऊ, असं सांगतानाच कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आंदोलनाची भाषा करत आहे, असा चिमटा त्यांनी काढला. दरम्यान, वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून विदर्भातही मनसे आक्रमक झाली आहे. राज्यपातळीवरील आंदोलनासाठी काल मनसेची बैठक पार पडली. यावेळी, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER