
अहमदनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत, शी टीका केली होती. यावर राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी, तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका, असे म्हटले होते. यावर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande) यांनी मुंडेंना टोमणा मारला – देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले? एक तरी उदाहरण दाखवून द्या.
फरांदे म्हणालात, ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सूडबुद्धीने कोणाचेही घर पाडले नाही. कुठलाही हातामध्ये कागद नसताना पुरावे नसताना कोणालाही धमकावण्याचे काम केले नाही. या राज्य सरकारचे म्हणाल तर अतिशय उत्तम उदाहरणकंगना राणावत हे आहे.
तुम्ही एखाद्या महिलेच्या एवढे मागे लागता की तिचे ऑफिस, ती तेथे नसताना पाडता. तुम्ही तिला कुठलीही संधी देत नाही, न्यायालयात जाण्याची संधी देत नाही, आणि तिचे ऑफिस पाडून टाकता.
विरोधकांनी एक तरी असे उदाहरण द्यावे की, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले आहे. कंगना प्रकरणात न्यायालयाने सरकारला चपराक दिली. आता न्यायालयानेही म्हटले आहे की, हे दमदाटी करतात, घाबरवतात, सूडबुद्धीने कारवाई करतात .आम्ही म्हणत होतो तेव्हा आमच्यावर विश्वास नव्हता. आता कोर्टानेच यावर शिक्कामोर्तब केले आहे,’ असे फरांदे म्हणाल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला