“कुणाच्या पायावर कुणाचे डोके?” दादांच्या फोटोवरून सेनाला पडळकरांचा टोला!

Gopichand Padlkar - AJit Pawar - Maharastra Today
Gopichand Padlkar - AJit Pawar - Maharastra Today

मंगळवेढा – पंढरपूर निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलीये. उद्या १७ एप्रिलला मतदान असल्यामुळं आज प्रचार थंडावला असला तरी टीका-टिप्पण्णी थांबलेली नाही. शिवसेना कार्यालयातील अजित पवारांचा (Ajit Pawar) फोटो समाजमाध्यमावर शेअर करत आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवार आणि शिवसैनिकांना डिवचलंय. ‘कुणाच्या पायावर कुणाचे डोके?’ असा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केलाय.

शिवसेना कार्यायलातील फोटो

आमदार गोपिचंद पडळकरांनी शेअर केलेल्या फोटोत अजित पवार खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्या समोर शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे बसलेत. पडळकरांनी या फोटोचा अर्थ लावताना, शिवसेनेचे पदाधिकारी अजित पवारांच्या पायावर डोकं तर ठेवत नाहीयेत ना? अशा आशयाची खोचक फेसबुक पोस्ट आमदार पडळकरांनी केलीये.

हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे न कधी समोर झुकले न त्यांनी कधी शिवसैनिकाला झुकायला लावलंय. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे सुत्र आली. त्यामुळं ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका विरोधक वारंवार करत असतात. शिवसैनिकांना या फोटोत बरोबरीची मिळत नसलेली वागणूक दाखवण्याचा प्रयत्न या फेसबूक पोस्टमधून गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

मंगळवेढा- पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. या मतदार संघातली पोट निवडणूक जाहीर करण्यात आली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय. भारत भालकेंचे पुत्र वडीलांच्या जागेवर निवडणूक लढत आहेत तर भाजपचे प्रशांत परिचारकांनी पारंपारिक मतदार संघ समाधान आवताडेंसाठी सोडलाय. उद्या १७ तारखेला या विधानसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button