मुंबई कोणाच्या बापाची, हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो, पण… कंगनावादात राष्ट्रवादीची उडी

Rupali Chakankar-Kangana Ranaut

मुंबई :  मुंबईत (Mumbai) परतण्यावरून कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीनेही (NCP) या प्रकरणात उडी घेतली आहे. ९ सप्टेंबरला मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर मी पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवावे, असं म्हणणा-या कंगना रणौतला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.

कंगनाला दिसणारी मुंबई ही मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे असं म्हटलं आहे. तसेच मुंबई कोणाच्या बापाची आहे हे आम्ही दाखवलं असतं, मात्र कंगनासारख्या कृतघ्न लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, असा टोलाही रूपाली यांनी लगावला आहे.

संजय राऊत आणि  कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यातील वाद चांगलाच चिघळला असून, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणा-या कंगनावर कारवाई व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. तसेच, कंगनाला मुंबईत येण्याचा अधिकार नसल्याचेही राऊत म्हणाले. राऊत यांच्या सुरात सूर मिसळत बॉलिवूड, मराठी कलाकारांनीही कंगनावर टीका करत तिला खडे बोल सुनावले. त्यावर कंगनाने खुले आव्हान देत मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे.

कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे ट्विट केले. कंगनाच्या या ट्विटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली यांनी उत्तर दिलं आहे. “मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो, पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगना रणौत तू उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे.” असा टोला रूपाली यांनी लगावला आहे.

ह्या बातम्या पण वाचा  : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER