पंढरपूरचा पराभव कुणाचा भालकेंचा की पवारांचा?

Samadhan Autade - Sharad Pawar - Bhagirath Bhalke - Ajit Pawar

तमाम मराठी माणसाचं आराध्यदैवत असलेल्या श्री विठुरायांच्या पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे (Samadhan Autade) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) भागिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा दारुण पराभव करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का आहे. पवार काका-पुतण्यांनी भगिरथ यांना उमेदवारी दिली होती. आम्ही भगिरथला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणतो असा शब्द अजित  पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठ्या साहेबांना दिला होता म्हणतात.

भगिरथ भालके हे चार प्रमुख पक्षांचे उमेदवार होते. तुम्ही म्हणाल ते तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन पक्षांचे उमेदवार होते मग हा चवथा पक्ष आला कुठून? राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असलेले भालके यांना शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसने (Congress) जाहीर पाठिंबा दिलेला होता. चवथा पक्ष होता, सहानुभूती. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक होती आणि सहानुभूती फॅक्टरचा विचार करून पवारांनी भगिरथ यांना संधी दिली. राज्यात सत्तेत असलेले तीन मोठे पक्ष आणि अधिक सहानुभूती अशा चौघांविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी समाधान अवताडे यांना मैदानात उतरविले आणि चमत्कार करून दाखविला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढूनही ५४ हजार मते घेणारे समाधान अवताडे यांना फडणवीस यांनी बरोबर हेरले. आता प्रश्न होता की पंढरपूरच्या राजकारणातील दिग्गज असे घराणे म्हणजे परिचारक. तर हे परिचारक घराणे अवताडे यांना पाठिंबा देईल की नाही? फडणवीस यांनी शिष्टाई केली आणि अवताडे व परिचारक यांना एकत्र आणले. अवताडेंना आम्ही निवडून आणतो तुम्ही चिंता करूच नका असा शब्दा विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी फडणवीस यांना दिला आणि तिथेच भाजपचे पारडे जड झाले. सोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होतेच. अवताडे-परिचारक-मोहिते पाटील या सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादीचा हिशेब चुकता केला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होणे हा पवार काका-पुतण्यांना मोठाच धक्का मानला पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे भालके यांच्या प्रचारासाठी गेले नव्हते. शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांसारखे बडबोले मंत्री गेले. ‘आयुष्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीसाठी मत मागण्याची वेळ आणली या बद्दल देवेंद्र फडणवीसांचे आभार’ असे विधान पाटलांनी प्रचारात केले. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बटण दाबण्याची शिवसेनेच्या मतदारांची मानसिकता शेवटपर्यंत बनू शकली नाही. सत्तेत एकत्र असलेले तीन पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर भाजपचा सहज पराभव करू शकतात या राजकीय तर्काला पंढरपूरच्या निकालाने जोरदार तडाखा दिला आहे. भाजप तिन्ही पक्षांना भारी पडला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत बसून आणि प्रचारासाठी मतदारसंघात फिरताना सोलापूरच्या राजकारणातील गटतटांना एकत्र आणले आणि अवताडे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास या निकालाने भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबद्दलची नाराजी लोकांनी या निकालाच्या निमित्ताने व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, लॉकडाऊनबाबतची धरसोड, अडचणीत असलेल्या शेतकºयांचे वीज बिल थकबाकीपोटी कनेक्शन कापणे यामुळे जनतेच्या मनात असलेला राग निकालातून बाहेर पडला. महाविकास आघाडीत या निकालावरून आरोप-प्रत्यारोप आता सुरू होतील.

ही बातमी पण वाचा : ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचे अदृश्य हात, भाजप नेत्याच मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button