फुकटात मंत्रिपद मिळवलेले आव्हाड कोणाचे एजंट?, निलेश राणेंचे जोरदार प्रत्युत्तर

Maharashtra Today

रत्नागिरी :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरून आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी आघाडी सरकारच्या मंत्र्यावर हल्लाबोल करत आरोप केला आहे. मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन असलेली गाडी का उभी केली ते एनआयच्या (NIA) चौकशीत उघड होईल. हा कट कोणाचा होता, याचे धागेदोरे कलानगरच्या बंगल्यापर्यत पोहचतील, असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. तसेच फुकटात मंत्रिपद मिळालेल्या जितेंद्र आव्हाडांचा(Jitendra Awhad) उगाच थयथयाट सुरु आहे, ते कोणाची एजंटगिरी करतायत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणावरुन (Phone tapping case) रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप करणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. जितेंद्र आव्हाड कुणाचे एजंट आहेत? जितेंद्र आव्हाडांना नैतिक अधिकार आहे का? घरात इंजिनिअरला खेचून आणत मारणारे हे मंत्री. तुम्ही महिलेवर आरोप करताय, तुमच्या आरोपाचा आधार काय? जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या संदर्भातला एकतरी पुरावा आहे का? काही आधार काय? असा सवाल निलेश राणेंनी(Nilesh Rane) विचारला.

जितेंद्र आव्हाड कशामुळे हे बोलतात, तर त्यांना फुकटात मंत्रिपद मिळालं म्हणून. कुठेतरी आपला थयथयाट दिसायला हवा, त्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे हे प्रयत्न असल्याची बोचरी राणेंनी केली.

ही बातमी पण वाचा : मी अहवाल लिहू शकतो हे फडणवीसांनी मान्य केले तेच माझ्यासाठी भरपूर – जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER