दोन्ही डावात एकाच गोलंदाजाकडून ‘काॕट अँड बोलड्’ झालंय कोण?

Who's out Caught and Bowled in both innings- sport news in marathi

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे जेवढे प्रकार आहेत त्यात हँडल दी बॉल, आॕबस्ट्रक्टींग दि फिल्ड हे तर दूर्मीळ आहेतच पण एखादा फलंदाज कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात धावबाद (Runout) होणे, यष्टीचित (Stumping) होणे किंवा गोलंदाजाकडेच झेल देऊन बाद होणे (Caught and Bowled) हेसुध्दा क्वचितच घडते. आता हे जे नंतरचे तीन प्रकार आहे त्यातही कमीत कमी बघायला मिळालेला फलंदाज बाद होण्याचा प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे काॕट अँड बोलड्.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 21 फलंदाज दोन्ही डावात गोलंदाजाकडे झेल देऊन परतले आहेत. 2007- 08 पासून असे एकदाही घडलेले नाही यावरुन हा प्रकार किती दूर्मीळ आहे याची कल्पना येते.

दोन्ही डावात गोलंदाजाकडे झेल देऊन परतलेला शेवटचा फलंदाज होता न्यूझीलंडचा राॕस टेलर. (Ross Taylor) 2007-08 च्या हॕमिल्टन कसोटीत त्याने पहिल्या डावात गोलंदाज केव्हिन पीटरसन व दुसऱ्या डावात मोंटी पानेसरकडे झेल दिला होता.

यासंदर्भात चार फलंदाजांच्या नावावर तर अगदी विशेष नोंद आहे. ती म्हणजे हे चार जण सामन्याच्या दोन्ही डावात गोलंदाजाकडेच झेल देऊन तर परतलेच आहेत पण दोन्ही डावात त्यांनी एकाच गोलंदाजाकडे झेल दिले आहेत हे आणखी विशेष. जाॕन ट्रम्बल (1884-85), एव्हर्टन विक्स (1948-49), कीथ मिलर (1950-51) आणि रिची बेनॉ (1960-61) हे ते चार फलंदाज आहेत. यापैकी जाॕन ट्रम्बल यांचा तर तो पदार्पणाचाच सामना होता तर एव्हर्टन विक्स हे दोन्ही डावात शतक झळकावल्यावर (162 व 101) यापध्दतीने बाद झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER