उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता ; निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

CM Uddhav Thackeray - Nilesh Rane

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या टीकेनंतर माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य, पण बिहारवर २० मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यातून उत्तर दिलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते राज्यपाल भगतसिंह यांच्यावरही निशाणा साधला. विविध मुद्यांवर भाष्य करताना ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER