नवी मुंबई एपीएमसीवर ताबा कुणाचा ?

Who will hold New Mumbai APMC

नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) निवडणुकीच्या मतदानाला आज शनिवारी सकाळी ८ पासून सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा, असा थेट सामना आहे. नवी मुंबई एपीएमसी ही राज्यातील सर्वांत मोठी अशी ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था आहे, हे विशेष. त्यामुळे यावर ताबा मिळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा यांनी कंबर कसली आहे. मतमोजणी २ मार्चला होणार असून, संचालकपदाच्या १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात आहेत.

एपीएमसीचे संचालक मंडळ २०१३ मध्ये बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी कारभार बघत होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता ही निवडणूक होत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद : महाविकास आघाडीत धुसफूस